|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हाऊस सत्तरी गावात खुबे खाल्याने अन्नातून विषबाधा ,35 रुग्णांना बाधा.

म्हाऊस सत्तरी गावात खुबे खाल्याने अन्नातून विषबाधा ,35 रुग्णांना बाधा. 

वाळपई प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील माऊस व दाबे गावामध्ये आज अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सुमारे 25 जणांना वाळपई दवाखान्यात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती ठिक असून कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे .

रात्री उशिरापर्यंत उपचारासाठी नागरिक मोठय़ा संख्येने वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी याची दखल घेत  सामाजिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांना कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावांमध्ये आज सकाळी फिरत्या मासळी विपेत्याकडून अनेकांनी खुबे घेतले होते. ज्यांनी सदर खुबे घेतले होते. त्यांच्यात घरामध्ये विषबाधेचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती उपलब्ध झाली. जवळपास 25 पेक्षा जास्त जणांना याची बाधा झाली असून त्यांना उपचारार्थ सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खुबे खाल्ल्यामुळे विषबाधा.

गेल्या काही वर्षापासून सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगवेगळय़ा ग्रामीण भागांमध्ये मोटर सायकल व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून मासळी विक्री करण्यात येत असते. यामुळे वाळपई शहरात नागरिकांना वाळपईत जाण्याची गरज नाही. सकाळीच ही मासळी गावागावांमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक  विकत घेत असतात. अशाच प्रकारे आज सकाळी एका दुचाकी मासे विपेत्याकडून अनेकांनी खुबे घेतले होते.म्हाऊस गावांमध्ये जवळपास दहा ते बारा कुटुंबियांनी सदर खुबे घेतले होते. दुपारी सदर  खुब्यामुळेच माध्यमातून जेवण झाल्यानंतर विषबाधेचा प्रभाव सुरू झाला. अनेकांना जुलाब उलटय़ा होऊ लागल्यामुळे संध्याकाळी पाचच्या नंतर वाळपई सामाजिक रुग्णालयात उपचारार्थ धाव घेण्यात आली.

फक्त खुब्यामुळेच विषबाधा.

दरम्यान यासंदर्भात देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार ज्या कुटुंबियांनी खुबे विकत घेतले होते. त्यांनाच उलटय़ा व जुलाब सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .भागातील नागरिक राजू गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार माउस गावांमध्ये हळूहळू हा प्रभाव सुरू झाल्यानंतर वाळपई सामाजिक रुग्णालयात अनेक नागरिकांनी उपचारार्थ धाव घेतली. खुबे खाल्ल्यामुळे हा प्रकार झाला की अन्य कोणत्या कारणास्तव यासंदर्भात या प्रश्नाला उत्तर देताना राजू गावकर यांनी सांगितले की सध्यातरी अन्य कोणत्याही प्रकारची विषबाधा होण्याची संभावना नसून ज्या कुटुंबीयांनी खुबे विकत घेतल्यावर त्यांनाच हा विषबाधेचा प्रकार झाल्याचे समजते. सदर भागातील नागरिक शरद गावकर यानीही अशाच प्रकारची शक्?यता व्यक्त केली असून याच्याच माध्यमातून नागरिकांना विषबाधा झाल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची विषबाधा यापूर्वी झाले नसून अचानकपणे आजच याविषबाधेचा प्रकार सुरू झाल्याचे शरद गावकर यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय अधिकाऱयाकडुन विषबाधा स्पष्ट.

दरम्यान यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत फडते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की म्हाऊस गावातील आतापर्यंत पंधरापेक्षा जास्त रुग्णांनी उपचारार्थ सामाजिक रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही.सध्यातरी फक्त एकच रुग्णाला सामाजिक रुग्णालयात दाखल करून ठेवण्यात आलेले आहे. आता त्यांच्या प्रकृती संदर्भातही कोणत्या प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे डॉ. फडते यांनी यावेळी स्पष्ट केले.

  मासळी विक्री विषय पुन्हा एरणीवर.

गेल्या काही दिवसापासून गोव्यामध्ये मासळी विक्रीचा विषय मोठय़ा प्रमाणात गाजत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला हानीकारक असल्याचे गैरसमज पसरण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सतरी तालुक्मयातील म्हाऊस गावांमध्ये अचानकपणे मासळीच्या माध्यमातून विषबाधा होण्याचे प्रकार यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या माध्यमातून मासेविक्री करण्यात येत असते. त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे भविष्यात तरी सरकारे हा विषय गंभीरतेने घेणार का अशा प्रकारचा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे..

आरोग्यमंत्री यांच्याकडून दखल.

दरम्यान यासंदर्भाची माहिती वाऱयासारखी पसरताच वाळपईच्या सरकारी दवाखान्यात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती .याची दखल गोवा राज्याचे आरोग्यमंत्री व  आमदार विश्?वजित राणे यांनी घेतली असून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱयांना कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची विशेष दखल घेणे गरजेचे असून यदाकदाचित खुब्याच्या माध्यमातून हा प्रकार घडल्यास यामधून आणखीही नागरीक बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. यामुळे या प्रकारात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नसल्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: