|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा : पहिल्या जिल्हा दिव्यांग संमेलनात रमले दिव्यांग बांधव

सातारा : पहिल्या जिल्हा दिव्यांग संमेलनात रमले दिव्यांग बांधव 

सातारा/प्रतिनिधी

धुल मेरे चेहरे पे थीमै आयना पुच्छता रहा, अशा शायरीतून अंध असूनही इतरांना प्रेरणा देणारे महाबळेश्वर येथील सनराईज कॅण्डलचे निर्माते भावेश भाटिया यांच्या भाषणाने सातारा जिल्हा दिव्यांग अधिवेशनात नवचैतन्य खुलवले गेले. तर आशा भवन मतीमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनीही उरी चित्रपटातील गीत सादर करुन उपस्थितांची वाहवाह मिळवली. टाळय़ा आणि शिटय़ांची दाद मिळवली. जे जे दिव्यांगाप्रती कार्य करतात, अशांचा गौरव करण्यात आला. दिव्यागांचे पहिलेच जिल्हास्तरीय अधिवेशन विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सक्षम संघटनेच्यावतीने जिह्यातील दिव्यांग संघटनांचे पहिले जिल्हा दिव्यांग अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला महाबळेश्वरचे अंध उद्योजक भावेश भाटीया हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी प्रशांत तरडे, डॉ.सुभाष दर्भे, विष्णू पंत देवधर, महाराष्ट्र प्रदेश विवेक जोशी, आनंदराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशानाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संत सुरदास यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यामध्ये वैशाली पाटणकर यांनी सक्षम गीत सादर केले.

देवधर म्हणाले, समाजामध्ये विकलांग व्यक्तींकरता जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून शिबीर घेतले जाते. परंतु हे जिह्यातील जे लोक दिव्यांगांच्यासाठी कार्य करतात. त्यांचे अधिवेशन आहे. सक्षमच्या सातारा शाखेची स्थापना 3 डिसेंबर 2017 रोजी झाली. सक्षमच्यावतीने दिव्यांगाप्रती कार्य केले जाते.

सुत्रसंचालक वैदेही कुलकर्णी यांनी शांता शेळके यांची अपंग आम्हा म्हणू नका ही कविता सादर करुन आणखी जान भरली. या अधिवेशनात दिव्यांगाकरता कार्य करणारे आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे गोपाळ खजुरे, आशा भवनचे प्रसाद, आशा ग्राम एकंबे, डॉ..शी एरम अपंग संस्थ कराड, प्रेरणकीनंत जननी सहअपंग संस्था, अक्षर साहिल अपंग संस्था वाई, गुलमोहर अध्ययन संस्था, आपुलकी संस्था यांच्याबरोबरच शिक्षिका मधुमती करंबेळकर, वीरेंद्र मल्लकमिर, सुरेखा जाधव, लक्ष्मी नुरे, प्राचार्य लीना तरडे, आशा कुलकर्णी, श्याम खांडेकर, निंभोजकर, पुष्पा आपटे, शांताराम जाधव, त्रम्बक खरे, शिल्पा सातपुते, सुहास पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिव्यांग म्हणून श्रीमती काळभोर, अनिता धनावडे, नंदकुमार धनावडे, राहुल जाधव, बडदरे यांच्यासह उपस्थित होते.

Related posts: