|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरणामध्ये पाईप लाईन फुटून पाणीपुरवठा बंद

महामार्ग चौपदरीकरणामध्ये पाईप लाईन फुटून पाणीपुरवठा बंद 

वार्ताहर/ पाली

मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाची प्रक्रिया ही वर्षभरापूर्वी पाली, मराठेवाडी बाजारपेठ या भागात प्रस्तावित महामार्गालगत सुरु करण्यात आली. त्यावेळी तेथून असणारी पुर्वीची पाली ग्रा.पं. शासकीय नळपाणी योजनेची पाईपलाईन प्रथमत: अन्यत्र हलविणे गरजेचे होते. परंतू त्याच्यावरच भराव टाकून काम करण्यात आल्याने ती अनेक ठिकाणी फुटली. त्याच्यावर तात्पुरती रिपेअरिंग करण्यात आली होती. परंतू आता काही महिन्यांतर या अर्धवट केलेल्या सपाटीकरणावरून वाहने गेल्याने ती तुटून पाण्याचा अपव्यय होऊन पाणीपुरवठा बंद राहत आहे. शिवाय मोठा भराव असल्याने तो बाजुला करून दुरुस्त करण्यातही मोठा वेळ लागतो आहे. पाली बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महामार्गालगत असल्याने तीचे स्थलांतरण तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

 

Related posts: