|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ऍक्सिस बँकेतील खाती एसबीआयमध्ये वळवणार

ऍक्सिस बँकेतील खाती एसबीआयमध्ये वळवणार 

ऍक्सिस बँकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता ?

ठाकरे बदलणार फडणवीसांचा निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस सरकारचे काही निर्णय बदलले असून आता फडणवीस सरकारने पोलीस कर्मचाऱयांची ऍक्सिस बँकेत खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हा निर्णय बदलण्याची शक्यता असून साधारण दोन लाख पोलीस कर्मचाऱयांची वेतन खाती ऍक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

   राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांची वेतन खाती ऍक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. यावरून फडणवीस यांच्यावर अनेकदा आरोपही झाले होते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे विरोधकांनी फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग करून ऍक्सिस बँकेला मदत केली का ? पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. तर त्यावर 2005 मध्येच पोलिसांची वेतन खाती ही ऍक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय झाला होता, असा दावा त्यावेळी फडणवीस यांनी केला होता. मात्र, तो दावा खोटा आहे. त्यावेळच्या शासननिर्णयात ही खाती एकटय़ा ऍक्सिस बँकेत वर्ग करण्यात यावीत, असे म्हटले नव्हते. मात्र, 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून परिपत्रक काढून पोलिसांचे पगार ऍक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. पोलिसांच्या वेतन खाती ऍक्सिस बँकेत असल्याने बँकेची वर्षाला जवळपास 11 हजार कोटींची उलाढाल होत होती. जवळपास दोन लाखाहून अधिक पोलिसांची खाती ठाकरे सरकारने एसबीआयमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यास ऍक्सिस बँकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Related posts: