|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त

जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त 

पुणे / प्रतिनिधी :  

आज जगात प्रचंड अशांतता पाहायला मिळते. धर्माच्या नावाखाली दुभाजन चालू आहे. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचा देखील आदर करावा, अशी प्रत्येक धर्मामध्ये शिकवण आहे. जगाला आज येशू ख्रिस्तांच्या शिकवणीची गरज आहे. ज्यांंनी त्यांचा छळ केला त्यांनाही येशू ख्रिस्तांनी क्षमा केली. मानवतेचा संदेश त्यांनी दिला. आज जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त आहेत. असा सूर सर्वधर्मीय स्नेहमेळाव्यात उमटला. 

डायोसिस ऑफ पुणे आणि स्वच्छंद, पुणे यांच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त सर्वधर्मीय स्नेहमेळाव्याचे आयोजन रेस कोर्स जवळील एम्प्रेस गार्डन रस्त्यावरील बिशप हाऊस येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.दत्तात्रय तापकीर, एस.एम.जोशी सोशल फाऊंडेशनचे प्रा. सुभाष वारे, मुस्लिम  विचारवंत अनिस चिश्ती, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, शीख विचारवंत सत्यपाल सिंह, लेफ्टनंट जनरल डॉ. दुहान, वसईचे सहपोलिस आयुक्त नरसिंह भोसले, माजी पोलीस उपायुक्त राजेंद्र सोनवणे, अजित कुमठेकर,स्वातंत्र्यवीर  सावरकर समितीच्या शुभा मराठे ,पर्यावरण तज्ञ डॉ. तारा पाठक, अभिनेत्री स्वाती सद्रे उपस्थित होते. मोहन जावळकर आणि प्रा. रविंद्र शाळू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विद्यार्थीनींनी प्रार्थना गीत सादर केले. 
पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, येशू ख्रिस्ताने प्रेम, क्षमा आणि ऐक्याची शिकवण दिली. सध्या धर्म, संस्कृती, भाषा या गोष्टींमधील भेदामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. आपल्या प्रत्येकाचा देव एक आहे. येशू देखील सर्वांचा असून सर्वजण येशूचे आहेत. वैश्विक सहिष्णुता ही येशू ख्रिस्त यांची शिकवण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Related posts: