|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » ‘काही मुलं गतिमंद असतात’ : शरद पोंक्षे

‘काही मुलं गतिमंद असतात’ : शरद पोंक्षे 

ऑनलाइन टीम / पिंपरी : 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘काही मुलं गतिमंद असतात’ अशा शब्दांत टीका केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ‘आम्ही सर्व सावरकर’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान दिले.

शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांचा दिल्लीमधील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला. ते म्हणाले, मला तर त्यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो, असा टोला शरद पोंक्षे यांनी यावेळी लावला.

 

 

Related posts: