|Thursday, February 20, 2020
You are here: Home » solapur » विजयदादांच्या वक्तव्यामुळे तालुक्याची गेली इज्जत

विजयदादांच्या वक्तव्यामुळे तालुक्याची गेली इज्जत 

प्रतिनिधी / सोलापूर

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सध्या तरी संपलेले नेतृत्व आहे. त्यांच्याकडे पक्षाविषयी सकारात्मक गुण, कर्तृत्त्व व तळमळ नाही. सत्तेसाठी भाजपमध्ये गेले. आता भाजप सत्तेमध्ये नाही, म्हणून मी राष्ट्रवादीतच आहे, असे म्हणून विजयदादांनी आपल्या व्यक्तव्यातून तालुक्याची इज्जत घालविली आहे, अशी प्रतिक्रिया माळशिरस राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नुकतेच साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मी राष्ट्रवादीचाच आहे, असे वक्तव्य केले होते. याच्या विरोधात उत्तमराव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. जानकर पुढे म्हणाले की, सत्तेसाठी विजयसिंह मोहिते-पाटीलांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. भाजप सत्तेत होती, म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता भाजप सत्तेत नसल्यामुळे मी राष्ट्रवादीचा आहे, असा झेंडा मिरवत आहेत. सध्या पिता-पुत्रांमध्ये ताळमेळ नाही. त्यांच्या भावांनाही त्यांच्या मागे नाईलाजास्तव फरफटत जावे लागते. आजघडीला विजयसिंह मोहिते-पाटील यांचे तालुक्यातील नेतृत्त्व संपुष्टात आले आहे. पक्षात आणि तालुक्यात त्यांची ताकद राहिली नाही. आता ते राष्ट्रवादीत आले तरी पक्षाची ताकद वाढणार नाही. उलट असे वक्तव्य करून त्यांनी तालुक्याची इज्जत घालवू नये, असा सल्लाही जानकर यांनी दिला आहे.

Related posts: