|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘फुले दांपत्य सन्मान दिवसा’ निमित्त बुधवारी भव्य रॅली

‘फुले दांपत्य सन्मान दिवसा’ निमित्त बुधवारी भव्य रॅली 

पुणे / प्रतिनिधी :  

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतीपथावर नेत आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील ‘फुले दांपत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीर्फे बुधवार दिनांक १ जानेवारी २०२० रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक-प्रसारक अशा हजारो समविचारी व्यक्ती सहभागी होणार आहेत, अशी माहिती माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे (नागपूर), रॅलीचे मुख्य संयोजक डि.के.माळी आणि महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप (पुणे) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अविनाश ठाकरे म्हणाले की, बुधवार दिनांक १ जानेवारी २०२० रोजी, सकाळी १०.३० (साडेदहा) वाजता भिडे वाडा येथे या भव्य रॅलीचे उद्‌घाटन  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सजवलेले दोन रथ, लेझीम आणि ढोल पथक यासाह फुले विचारांचे फलक असलेले  नागरिक या रॅलीत सहभागी होणार आहेत.
भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होणार असून ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप  रस्त्याकडे येणार आहे. तिथून फुले वाड्यावर ही रॅली येणार आहे. या रॅलीचे रूपांतर भव्य सभेत होणार असून गंजपेठ येथील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

Related posts: