|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » मला अजून खूप काम करायचय: अमिताभ बच्चन

मला अजून खूप काम करायचय: अमिताभ बच्चन 

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली:

 सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना रविवारी सिनेक्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाहीत ना, अशी शंका आली. पण मला अजून खूप काम करायचयं,’ अशा शब्दात अमिताभ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली इच्छा व्यक्त केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराच्या यापूर्वीच्या समारंभात अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे रविवारी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related posts: