|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » मंत्रिमंडळ विस्तार : ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मंत्रिमंडळ विस्तार : ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

मी अजित अनंतराव पवार शपथ घेतो की… असे म्हणत अजित पवार यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

दरम्यान, विधानसभेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. अजित पवार सोबतच काँग्रेसचे अशोक चव्‍हाण, राष्‍ट्रवादीचे नेते धनंजर मुंडे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, जळगावमधील शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार संजय राठोड, शिवसेना आमदार संदिपान भुमरे, काँग्रेसचे विदर्भातील आमदार सुनिल केदार, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारयांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांनी  कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

मराठवाड्यातील शिवसेना नेते अब्दुल सत्तार, बच्चू कडू, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, राजेंद्र पाटील यड्रावकर,  सतेज (बंटी) पाटील, विश्वजीत कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

 

Related posts: