|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » सुबोध भावाचा सणसणीत टोला ,”२० मीटरच अंतर पार केलं तर देश बदलेल”

सुबोध भावाचा सणसणीत टोला ,”२० मीटरच अंतर पार केलं तर देश बदलेल” 

ऑनलाइन टीम / मुंबई 

‘स्वच्छ भारत अभियान’ एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो . केंद्र सरकारने देशातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशात राबवायला सुरुवात केली. मात्र या अभियानात लोकांचा आवश्यक तितका सहभाग अजून दिसून येत नाही . हे अभियान लोकांनी प्रतिसाद दिल्यास यशस्वी होऊ शकते . सुबोध भावे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि याच अभियानावरून त्यानं सणसणीत टोला देत एक पोस्ट केली आहे.

सुबोधने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे जवळच कचरापेटी असतानाही अज्ञाताने पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच फेकलेल्या दिसत आहेत. यावर “जेव्हा आपण हे २० मीटरच अंतर गाठु तेव्हा आपला देश आपोआप बदलेल… आपला देश, स्वच्छ देश” अशा शब्दात सुबोधने आपला संताप व्यक्त केला आहे.सुबोध भावे सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या घटनांवर तो आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असतो . यावेळी त्याने रस्त्यांवरील अस्वच्छतेबाबत आपले मत मांडले आहे. त्याने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Related posts: