|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » बेडरूम

बेडरूम 

हल्लीच्या मुलांचा वेगळी बेडरूम असण्याचा हट्ट असतो. तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली रचणे अगत्याचे झाले आहे. मुलांची खोली ही अलीकडे आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करू लागली आहे. ही खोली नेहमीच पसाऱयाने भरलेली असते. त्यातल्या त्यात बेडरूम अडगळमुक्त ठेवायचा प्रयत्न व्हायला हवा.

मुलांसाठी एक खोली रिझर्व्ह ठेवायची गरज आता अधोरेखीत होत आहे. त्यांना स्वत:ची स्पेस हवी म्हणून अनेकजण मुलांच्या खोलीची रचना करतात. मुलांना त्यांच्या खोलीचा व्यवस्थितपणा राखण्याची सवय सुरूवातीपासून लावायला हवी. कारण बऱयाचदा मुले वस्तु इतरस्त्र पसरून टाकत असतात. मुलांच्या बेडरूमची स्वच्छता करायची वेळ येते तेव्हा नाकीनऊ येते. त्यांच्या खोलीत वस्तू इतरस्त्र पडलेल्या असतात. पालक त्यांच्या खोलीत शिरले तर त्यांना आवराआवर करण्यासाठी कंबर कसावी लागते. जर का मुलांना त्यांच्या लहानपणीच शिस्त लावली तर पुढे ही मुले वस्तू इतरस्त्र टाकणार नाहीत. त्यांच्या कपडय़ांबाबत वापरातले आणि न वापरातले यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. कपडे इतरत्र टाकलेले नसावेत. धुवायला टाकायचे कपडे बास्केटमध्ये ठेवावेत.

पुस्तके, स्टेशनरी आदीसाठी वेगळे रंगीत शेल्फ करायला हरकत नाही. शेल्फ दिसायला तर छान दिसतेच शिवाय जागाही वाचवणारे असते. खोलीच्या सजावटीला अनुकूल रंगातील वस्तू या बेडरूमसाठी निवडता येतात. जर का सारं काही जागच्या जागी ठेवलं गेलं तर मुलांमध्येही त्याबाबत जागरूकता निर्माण होईल. सुरूवातीपासून त्यांना शिस्तीचे धडे द्यायला हवेत. जागच्या जागी वस्तु ठेवण्याबाबत मुलांना आग्रह करायला हवा.

जर का एखाद्या खुर्चीवर व टेबलावर सामानांची गर्दी असेल तर मुलं त्यावर बसणार नाहीत. म्हणजे प्रत्येक वस्तु जागच्या जागी लागणं आवश्यक असतं. लेबलींग करणंही फायदेशीर ठरतं. वर्तमानपत्राच्या कागदाची चिठ्ठी त्या त्या वस्तूवर लावल्यास उत्तम ठरेल. रंगीत कागदी पट्टय़ांच्या साहाय्याने वस्तुंवर चिकटवता येतात. आणखी एक गोष्ट करता येते. दरवाजाच्या आतल्या बाजूने हँगर्स लावता येतात. ही हँगर्स मुलांचे हात पोचतील अशा उंचीवर लावले जातील याची दक्षता घ्यायला हवी. म्हणजे काहीही लटकवायचं झालं तर ते या हँगर्सना लटकवतील. इतरत्र ठेवण्यापेक्षा हँगर्सना वस्तू लटकवणं अधिक सोयीचं होईल. मुलांच्या बेडरूमसाठी थोडं नियोजन करावं लागतं.

टीप्स

पलंगाची उंची मुलाच्या उंचीनुसार योग्य असावी.

फरशा शक्यतो वुडन असतील तर उत्तम किंवा मग फरशांवर रग किंवा कार्पेट घालता येईल.

टेबलावर वहय़ा, पुस्तकांचा ढीग रचायला देऊ नका.

खुर्ची आणि टेबल यांची रचना योग्य आहे हे पाहा.

खोलीत सर्वत्र कचरा पसरायला देऊ नका.

कपाटातील वह्य़ा, पुस्तके व्यवस्थित लावलेली असतील हे पाहा.

पलंगावरील पलंगपोस, अभ्रे नीट असतील हे पाहा.

पेन, पेन्सील इतरत्र पडू नये यासाठी एक स्टँड घेता येतो.

Related posts: