|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » इराणमधील 52 ठिकाणे अमेरिकेच्या निशाण्यावर : डोनाल्ड ट्रम्प

इराणमधील 52 ठिकाणे अमेरिकेच्या निशाण्यावर : डोनाल्ड ट्रम्प 

 ऑनलाईन टीम / बगदाद :

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराकने बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि मोर्टार डागल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील 52 प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे.

अमेरिकेने गुरुवारी रात्री बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात इराकचा मेजर जनरल कासिम सुलेमानचा खात्मा झाला. तर शनिवारी सकाळी अमेरिकेने पुन्हा बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वाहनांमधून प्रवास करणाऱया सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी चा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.

त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील महत्त्वाच्या 52 ठिकाणांवर अमेरिकेचा निशाणा आहे. अमेरिकेच्या कोणत्याही ठिकाणावरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. असा हल्ला करणाऱयांचा शोधून खात्मा करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Related posts: