|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 5 ते 11 जाने. 2020

मेष

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, रवि, बुध युती होत आहे. तुमच्या धंद्यात वाढ होईल. जम बसेल. मागील येणे वसूल करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात जे ठरवाल ते करून दाखवता येईल. नम्रता ठेवा. आक्रमता प्रसंगानुरुप दाखवा. प्रवासात वाहन जपून चालवा. राग आवरा. नोकरीत प्रभाव पडेल. प्रगतीची संधी मिळेल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार करता येईल. स्पर्धेत प्रगती कराल. ओळखी वाढतील. शेतकऱयांचा प्रश्न सुटेल. कठीण काम करून घ्या.


वृषभ

 कुंभ राशीत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. रागाने संबंध तुटतील. नम्रपणे बोला. वाहन जपून चालवा. स्वत:ची काळजी घ्या. नोकरीत दडपण राहील. विरोधक जास्त तयार करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. तुम्ही विचारात पडाल. कोर्टकेस सोपी नाही. विचारपूर्वक बोला. संसारातील कामे होतील. वृद्ध व्यक्तीला जपावे लागेल. शेतकऱयाने संयम ठेवावा. मार्ग मिळेल. फसू नये.


मिथुन

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. जीवनसाथीची प्रगती होईल. धंद्यात वाढ करता येईल. वसुली करा. नवे काम मिळवा. नोकरीत प्रभाव पडेल. फायदा होईल. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. राजकीय, सामाजिक कार्यातील कोंडी सोडवता येईल. पद मिळेल. कला, क्रीडा स्पर्धेत चमकाल. शेतकरी वर्गाला मार्ग मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.


कर्क

कुंभ राशीत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. तुम्ही ठरविल्याप्रमाणे धंद्यात काम होईल, असे समजू नका. तडजोड करावी लागेल. वाद वाढवू नका. नुकसान टाळा. नम्रपणे बोला, वागा. नोकरीत कायद्याचे पालन करा. तुमच्यावर आरोप येऊ शकतो. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या मोहात पडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रसंगानुरुप वागा. जिद्दीपणा, राकटपणा करू नका. शेतकऱयांनी निराश होऊ नये.


सिंह

कुंभ राशीत शुक्रप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. मागील येणे वसुल करा. रेंगाळलेला व्यवहार पूर्ण करता येईल. नोकरीत प्रभाव पडेल. शेतकऱयाला दिलासा मिळेल. योग्य सल्ल्याने कामे करा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीचे पाऊल उचलाल. राग वाढवणारी कृत्ये विरोधक करतील. वाहन हळू चालवा. स्पर्धेत प्रगती होईल. केस जिंकाल. घरातील समस्या मिटेल.


कन्या

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, शनि, प्लुटो युती होत आहे. धंद्यात सावध भूमिका घ्या. तुमचा उत्साह राहील. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने सर्व बिघडू शकते. वसुलीसाठी धावपळ होईल. नोकरीत नमते घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात इतरांना दुखवू नका. पैसे सांभाळा. टिका करतांना स्वत:ची प्रति÷ा सांभाळा. कला, क्रीडा स्पर्धा कठीण असेल. शेतकरी वर्गाने विचार करून निर्णय घ्यावा. घाबरु नये.


तुला

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात जम बसेल. वसुली करता येईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. नोकरीत वर्चस्व दिसेल. वरि÷ खूष होतील. शेतकरी वर्गाने प्रगतीचा नवा विचार करावा. पैसे नीट गुंतवावे. कर्ज फिटेल. कोर्टकेस संपवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा वाढेल. कठीण काम करून घ्या. स्पर्धेत चमकाल. मौल्यवान खरेदी कराल.


वृश्चिक

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात मेहनत घ्या. फायदा वाढेल. मोठे कंत्राट मिळवा. ओळखी वाढवा. वसुलीसाठी दगदग होऊ शकते. शेतकरी वर्गाला नव्या दिशेने प्रगती करता येईल. कर्ज फिटेल. केस संपवा. वाहन हळू चालवा. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मत ग्राहय़ धरले जाईल. प्रति÷ा मिळेल. इच्छा पूर्ण होईल.


धनु

कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. कठीण काम करा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. धंद्यात फायदा होईल. पैसे नीट ठिकाणी गुंतवा. नोकरीत लाभदायक घटना घडेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. तणाव कमी करता येईल. कोर्टकेसमध्ये नम्रता ठेवा. शेतकरी वर्गाला दिलासा देणारी घटना घडेल. इच्छुकांना लग्न, संततीप्राप्ती होईल.


मकर

कुंभेत शुक्र प्रवेश, शनि, प्लुटो युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात फसगत होऊ शकते. भरपूर नफा असलेली स्कीम तुमच्याकडे येईल. घाईत निर्णय घेऊ नका. नोकरी टिकवा. चर्चा वादाकडे जाऊ शकते. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात तटस्थपणे अवलोकन करा. मतप्रदर्शनाची गरज नाही. तुमचे बद्दलचे मत बिघडवू नका. स्पर्धा कठीण आहे. शिक्षणात जिद्द ठेवा. शेतकरी वर्गाने हार मानू नये.


कुंभ

तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. धंद्यात लाभ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. नोकरीत प्रभाव पडेल. बढती होईल. परदेशात जाल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. शेतकरी वर्गाला नव्या मार्गाने जाता येईल. फायदा होईल. कर्ज कमी करता येईल. कोर्टकेस संपवा. स्पर्धा जिंकाल.

मीन

कुंभेत शुक्र प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात जम बसेल. वसुली होईल. मोठे कंत्राट मिळेल. शेतकरी वर्गाचा उत्साह वाढेल. माल विकता येईल. नवे पीक घेता येईल. नोकरीत प्रगती होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नावलौकीक वाढेल. जवळच्या लोकांची नाराजी दूर करावी लागेल. स्पर्धा जिंकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. शिक्षणात प्रगती होईल. साहित्याला नवा विषय मिळेल.

Related posts: