|Thursday, February 20, 2020
You are here: Home » solapur » मॅरेथॉन दरम्यान गॅस टाकीचा स्फोट

मॅरेथॉन दरम्यान गॅस टाकीचा स्फोट 

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी सकाळी सोलापुरात आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गॅसचे फुगे फुगवताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात 6 जण जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास डफरीन चौक परिसरातील ज्ञानप्रबोधनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली. स्फोटानंतर जखमींना तातडीने खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.   

रविवारी 5 जानेवारी रोजी पहाटे हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी हरीभाई देवकरण प्रशाला आणि डफरीन चौक परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक धावपटू तसेच त्यांच्यासोबत असलेले एकूण 10 हजार लोक एकत्र आले होते. स्पर्धेसाठी गॅसचे फुगे फुगवणारा फुगेवाला शमशुल अहमद सुलेमान शेख (वय 34, रा. मड्डी वस्ती, शांती नगर) हा तेथे त्यांची लाल रंगाची दुचाकी एम.  80 (क्र. एम. एच. 06.ए./3034) घेऊन आला होता. त्या गाडीवर गॅसचे सिलेंडर लावण्यात आले होते. साडेपाचच्या सुमारास गॅस भरण्यासाठी त्याठिकाणी मानसी दीपक मुंदडा (वय 20, रा. मंगळवार पेठ) आणि त्याचा भाऊ गोपाळ संतोष मुंदडा हे दोघेजण आले होते. फुग्यामध्ये गॅस भरताना गॅस सिलेंडर टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये गॅस भरणारा शेख, मुंदडा भाऊ-बहीण, चंद्रकांत भिमण्णा खडाखडे (वय 36, रा. लक्ष्मी चौक, सोरेगाव), विनायकसिंग छोटुसिंग परदेशी (वय 30, रा. जुळे सोलापूर) आणि हरिदास मोहन माने (वय 20, रा. कावेरी नगर, कुमठे, ता. उत्तर सोलापूर) हे जखमी झाले.

या घटनेनंतर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. तसेच बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. जखमी झालेला फुगेवाला शेख याला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आयोजकांनी बोलावलं होतं. त्यामुळे मी इथे गॅसचे फुगे फुगवण्यासाठी आलो होतो, असे सांगितल्याचे सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले.

मुलगी सहा फूट हवेत उडाली

या घटनेनंतर या ठिकाणी गोंधळ उडाला. घटनास्थळावर रक्त सांडल्याचे दिसत होते. स्फोटानंतर मानसी मंदडा ही दहा फुट उडाल्याचे काही जणांनी सांगितले. या स्फोटामध्ये तिच्या पायास सिलेंडरचा पत्रा लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्यांना तातडीने या ठिकाणी रनर्ससाठी असलेल्या रुग्णवाहिकेने खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले.

Related posts: