|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वृक्षतोड होण्याआधीच रक्षण व्हावे

वृक्षतोड होण्याआधीच रक्षण व्हावे 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाबळेश्वर शहरापासून केवळ 1 किलो मीटर अंतरावरील प्रसिद्ध वेण्णालेक रस्त्यालगत दीना हॉटेलशेजारी पालिका हद्दीतील सि. सर्व्हे 144/ब या घनदाट वृक्षराजींनी वेढलेल्या मिळकतीमधील वृक्षराजी सध्या धोकादायक परिस्थितीत आहेत. दोनवेळा केवळ पर्यावरणप्रेमींच्या जागृततेमुळे या मिळकतीतील वृक्षतोडीचा प्रयत्न फसला. असे असतानाही पुन्हा नव्याने त्यासाठीचा प्रयत्न सध्याचा मिळकतदार करण्याची शक्यता वाटत असल्याने व त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे सध्याच्या तेथील हालचालीवरून पर्यावरणप्रेमींना वाटत असल्याने वृक्षतोड होण्याआधीच तिचे रक्षण व्हावे, अशी मागणी महाबळेश्वरातील पर्यावरणप्रेमींनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

  तसेच त्याच्या प्रती त्यांनी माहिती कारवाईसाठी मा.अध्यक्ष उच्च स्तरीय सनियंत्रण पर्यावरण समिती ,मा.अध्यक्ष बोंम्बे एन्व्हारोन्मेट एक्शन ग्रुप ,मा. डॉ.फारूक वाडिया पर्यावरणप्रेमी पुणे ,उप विभागीय अधिकारी वाई ,महाबळेश्वर तहसीलदार तसेच मुख्याधिकारी महाबळेश्वर नगरपालिका यांना पाठविल्या आहेत .

    महाबळेश्वर पालिका हद्दीतील सेक्टर 2 मध्ये सदरहू मिळकत येत असून ती एकूण 22 गुंठे  आहे .प्रचंड विविध जातीच्या लहान मोठय़ा वृक्षराजीनी हि मिळकत वेढलेली असून ती खाजगी पण वनसदृश्य अशी आहे. महाबळेश्वर शहरापासून प्रसिद्ध वेण्णा लेक रस्त्यालगत दिना  हॉटेलशेजारी असलेली हि मिळकत आज पर्यंत दोन तीन वेळेला  पुणे ामुदृत्त्gख्र्tश्ह्न धनिकांकरवी हस्तांतरित  केली गेलेली आहे .सन 2002 साली मिळकतीवर विकास कामे करण्यासाठी मिळकतीत वृक्षतोड करून साफ सफाई करण्याचा गैरप्रकार  झाला होता त्यात 9 वृक्षांची तोड झाल्याचे उघडकीस आले होते तसेच सन 2011 मध्ये हि पुन्हा त्याच सर्वे मध्ये 11 वृक्षांची तोड झाली होती .आज पर्यंत या मिळकतीतील  बांधकामाच्या आड येणाया  सुमारे 20  झांडाची कत्तल केल्याची व त्यात्या मालकांवर वृक्ष तोडी बद्धल पालिके करवी गुन्हे  दाखल करून तत्कालीन बांधकामाचा आराखडाही रद्द केला गेला होता अशी  हि माहिती उपलब्ध असू त्याचा हि या निवेदनात उल्लेख आहे.   दरम्यान  येथील तत्कालीन जागृत पर्यावरण प्रेमींच्या जागृतातेमुळे च तेथील संभाव्य मोठी वृक्ष तोड वाचली होती व  वनप्रेमींनी   वेळीच त्यात हस्तक्षेप करून वृक्ष तोड करणायांना रंगे हात पकडून तेथून  त्यांना पिटाळून लावले होते व त्यांची हत्यारे हि जप्त करायला संबंधिताना भाग पाडले होते . त्यामुळेच  तेथील  मोठय़ा  वृक्ष तोडीचा व पर्यावरणाच्या खहासाचा  अनर्थ टळला होता.  व हि या खाजगी पण वनसदृश्य मिळकत सुरक्षित राहिली होती . मात्र आता पुन्हा 9 वर्षांनी या मिळकतीतील रस्त्यालगतच्या बाजूने उंच उंच लोखंडी खांब आडवे उभे लावून तो  आच्छादन टाकून बंदिस्त कारण्याच्या प्रयत्नात  सध्याचा या मिळकतीचा धनिक असल्याचा संशय पर्यावरण प्रेमीना येत असल्याने वृक्ष तोड होण्यापूर्वीच संबंधितानी  यात लक्ष घालून या मिळकतीतील वृक्ष राजींचे रक्षण करावे अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे . सध्या एका खागाजी ठेकेदाराकरवी हे काम हा मिळकतदार करीत असून रस्ता लगतचा दर्शनी  भाग बंदिस्त करून मोठय़ा प्रमाणावर पुन्हा वृक्ष तोड होण्याची भीती  पर्यावरण प्रेमींना वाटत आहे. 

   महाबळेश्वर व परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी व वृक्षतोडीला आळा बसावा म्हणून व या भागातील निसर्ग सौदर्य व पर्यावरण आबादित राहावे म्हणून  केंद्रशासनाने 2001 सालामध्येच हा संपूर्ण परिसर पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला आहे . तसेच येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्याचावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च स्थरीय सनियंत्रण समितीही नेमली असून तिच्या बैठका हि वेळो वेळी येथे  होत असतात .तसेच नव्याने या बाबत व या भागातील अनधिकृत वृक्ष तोड व बांधकामाबाबत मा. हरित लवाद न्यायालय दिल्ली येथे प्रकरणे सुरु आहेत .असे असताना बांधकामासाठी वरील प्रकारे ईतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाटत असेल व  वृक्ष तोड होणार असेल तर ती तोड होण्याआधीच वाचली जावी व तेथील निसर्गाचे ,वृक्षांचे व पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करावे अशी मागणी निसर्ग प्रेमीनी  केली आहे.

Related posts: