|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पुस्तके खरेदी करण्यासाठी साताकरांची तोबा गर्दी

पुस्तके खरेदी करण्यासाठी साताकरांची तोबा गर्दी 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयाच्या 21 व्या ग्रंथ महोत्सवामध्ये खास करुन रविवारची सुट्टी असल्याने सातारकरांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. व्यक्तीमत्त्व विकास, आत्मचरित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, तसेच नवीन वर्षाची डायरी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांना मोठी मागणी होताना दिसत होती. काही संस्था पुस्तके खरेदी करताना दिसत होते.

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने साताऱयातल्या ग्रंथ महोत्सवाला आवर्जुन भेट देणारे अनेकजण दिसत होते. त्यामध्ये नोकरदार, व्यवसायिक आपल्या कुटुंबीयासमवेत येवून पुस्तके खरेदी करताना दिसत होते. बालहट्ट आपल्या आई-वडिलांच्याजवळ करत होते, की मला हेच पुस्तक पाहिजे, आईला आणि बाबांनाही ते पुस्तक द्यावे लागते, असे चित्र बहुतांशी स्टॉलवर रविवारी दिसत होते. सातारकरांनी संस्कृती, मेहता, साकेत अशा स्टॉल्सना भेटी देत असल्याचे चित्र होते. सातारकर बालचमूंकडून गोष्ट महाराजा सयाजीरावची, राजा बनायला आलोय, धर्मा, सारी कमाई, पांढऱया हत्तीची गोष्ट, गोष्ट कापडय़ाच्या जोडय़ाची, गोष्ट एका चप्पलेची, गोष्ट अर्चनाच्या गाडीची, रंग नाही पाण्याला, वहितलं बालपण, आनंद मेळा, नीतिकथा, दशक्रिया घाटावरची अशा पुस्तकांना मागणी होताना दिसत होती. तर तरुण मंडळींकडून वॉरन बॅफे, डॉ. ए. पी. जे. कलाम, लाईफ स्टाईल, विश्वातील महान 20 शास्त्रज्ञ, आपले बाबासाहेब, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वेडा विश्वनाथ, नारायण धारप या पुस्तकांना मागणी होताना दिसत होती. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे, नारायण धारप, जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे यांच्या पुस्तकांबरोबरच रणजित देसाई, द. मा. मिरासदार यांच्या पुस्तकांनाही मागणी होताना दिसत होती.::

मी दहा हजार रुपयांची पुस्तके घेतली

मी या ग्रंथ महोत्सवात सहकुटुंब आलो आहे. शशी थरुर यांचे ब्रम्ह भारत, भगतसिंग खटला, बुलेट फॉर बुलेट, मुळच्या चित्रकथा अशी दहा हजार रुपयांची पुस्तके खरेदी केलेली आहे. पुस्तके खरेदी करताना मला खूप आनंद वाटला.::

ऍड. विजय यादव सातारा

Related posts: