|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अपहरण करुन पुण्याच्या व्यापाऱयाचा खून

अपहरण करुन पुण्याच्या व्यापाऱयाचा खून 

 

वार्ताहर/ लोणंद

पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन) यांचा  दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून धारदार शस्त्राने वार करून, डोक्यात व छातीत दोन गोळ्या झाडून खून करण्यात आला. व त्यांचा मृतदेह पाडेगाव (ता. खंडाळा) गावचे हद्दीत आणुन टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाडेगाव (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीमध्ये कॅनॉलच्या बाजूला एक अनोळखी पुरुष जातीचे 45-50 वयाचे प्रेत मिळून आले. या मृतदेहाच्या छातीवर बंदुकीची गोळी मारून खून केल्याचे दिसून आल्यानंतर लोणंद परिसरात खळबळ उडाली होती. या खूनाची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 45 ते 50 वयाच्या व्यक्तीच्या पोटात बंदुकीची गोळी घालुन खून केल्याचे दिसून आले तर शरीरावर जखमा आढळुन आल्या. त्यामुळे या अज्ञात व्यक्तीचा खून इतर करून या आणुन टाकले असल्याचे दिसून आले.

   त्यानंतर लोणंद पोलिसांनी पंचनामा सुरु केला. त्याचबरोबर अज्ञाताची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे फोटो व माहिती व्हायरल केली. तसेच अशी कोण व्यक्तीची मिसिंग आहे का याची माहिती घेतली असता पुणे येथील चप्पल विक्रीचा व्यवसाय करत असलेले चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन  हे साधूवासवानी चौकातील परमार पॅराडाईझ येथे कुटुंबियासोबत राहत होते.  शनिवारी रात्री साडे दहा वाजता त्यांना कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याचे समोर आले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोबाईलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला, परंतु तो होऊ शकला नव्हता. या मिसींगबाबत चौकशी केली असता पाडेगाव येथे आढळुन आलेला मृतदेह व्यापारी चंदन शेवानी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

  लोणंद पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून त्यात ‘2 सीआर. नही दिये, इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा’ असे, लिहले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शनिवारी दिवसभर चंदन शिवानी हे घरीच होते. मात्र, रात्री पावणे दहानंतर अचानक ते गायब झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे.

 घटनास्थळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे आदींनी भेट देऊन पाहणी करून तपासकामी सूचना दिल्या.

चंदन शेवानी यांच्या छातीत डाव्या बाजूस व डोक्यात पाठीमागे अशा दोन ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यापैकी छातीवर हात ठेवल्याने एक गोळी हाताच्या अंगठय़ाला भेदून आरपार गेल्याचे दिसून आले.

  शेवानी यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला. याबाबत लोणंद पोलिसांत फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.

Related posts: