|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » संवाद » यशाचा पाया आत्मविश्वास

यशाचा पाया आत्मविश्वास 

आ पल्या यश मिळविण्यासाठीच्या मार्गावर व प्रयत्नात मन आपला भागीदार कसा आहे, हे  पाहुया.  आपण जे ध्येय निश्चित केले आहे, त्यावर ठाम राहून, लक्ष विचलित करणाऱया गोष्टींपासून दूर राहावे.  काही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो. त्यातून काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास.

आपण ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहाणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने तुमची योजना आहे. तुम्ही ती प्रयत्नपूर्वक राबवत आहात, तर मनाची जी अवस्था तुम्हाला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास! तुमचाच तुमच्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल? तुम्हाला विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, तुमची एकाग्रता राहणार नाही. दुसरे तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार तुम्ही करत बसाल, त्याचा तुम्हाला राग येईल, दु:ख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, तुम्ही आत्मविश्वास बाळगणे.

आत्मविश्वास असल्यावर तुम्हाला बरोबर वाटणारी, तुम्ही ठरवलेली गोष्टच तुम्ही करता. तुम्ही काही जोखीम उचलून जास्तीचे काम करायला तयार होता. तुमच्या चुका मान्य करून दुसऱयाकडून शिकायची तयारी ठेवता. मेहनत करून यश मिळवताना कौतुकास पात्र होता व यश सर्व संबंधितांना घेऊन साजरेही करता.

एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा आराखडा तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयशाची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो. ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तुमची तयारी व रणनीती विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.

जर तुम्ही न्यायाने पुढे जात असाल, तुमच्या कामाचा आराखडा तुमच्याकडे आहे, मार्गावर येणाऱया अडचणींवर मात करण्याची तुमची तयारी आहे आणि तुमचा तुमच्यावर विश्वास आहे, तर कोणतीही गोष्ट करणे शक्मय आहे.  आत्मविश्वास बनवता येतो व तो वाढवता येतो. ती एक मनाची अवस्था आहे, जी स्वत: स्वीकारावी लागते. यामुळेच बहुधा यशाकडे यश, पैशाकडे पैसा जातो, असे आपण बघतो; पण हे समजण्यात चूक करू नका, की प्रथम त्या व्यक्तीने पहिल्यांदा ती शक्ती व सामर्थ्य स्वत:च स्वत:कडे तयार केलेले असते. त्यासाठी आपल्या मनात, विचारात, वागणुकीत व प्रत्यक्ष काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा, बदल, प्रगती केलेली असते.

Related posts: