|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » सेरेना उपांत्यपूर्व फेरीत, गॉफ पराभूत

सेरेना उपांत्यपूर्व फेरीत, गॉफ पराभूत 

वृत्तसंस्था /ऑकलंड :

डब्ल्यूटीए टूरवरील 2020 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या पहिल्या ऑकलंड क्लासिक महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉप सीडेड तसेच ताज्या मानांकन यादीत दहाव्या स्थानावर असलेल्या सेरेना विलीयम्सने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले.

गुरूवारी झालेल्या या स्पर्धेतील दुसऱया फेरीच्या सामन्यात सेरेना विलीयम्सने ख्रिस्टीना मॅकहॅलेचा 3-6, 6-2, 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सेरेना आणि जर्मनची सिगमंड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या लॉरा सिगमंडने अमेरिकेच्या गॉफचा 5-7, 6-2. 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व गाठली. अन्य एका सामन्यात रूमानियाच्या कॅरोलिनी वोझिनियाकीने ऑकलंड स्पर्धेतील माजी विजेत्या लॉरेन डेव्हिसवर 6-1, 4-6, 6-4 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेतील विद्यमान विजेती ज्युलीया जॉर्जेसने टेकमनचा 6-3, 6-2 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

Related posts: