|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अनुदानाअभावी वाडियातील बालरुग्णांना घरचा रस्ता

अनुदानाअभावी वाडियातील बालरुग्णांना घरचा रस्ता 

पालिका प्रशासन आणि वाडिया रुग्णालयाच्या वादात रुग्णांचे हाल

मुंबई / प्रतिनिधी

परळ येथील वाडिया रुग्णालयात सध्या एकही नवीन रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे समोर आले आहे. तसेच दाखल रुग्णांना इतरत्र सेवा घेण्याबाबतचे सूचविण्यात येत असून 50 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. सरकारकडून मिळणाऱया अनुदानाअभावी रुग्णसेवेचा डोलारा यापुढे कसा चालवावा असा प्रश्न वाडिया प्रशासनासमोर पडला असल्याने नवीन रुग्ण दाखल न करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे एका उच्च पदाधिकारी डॉक्टराकडून सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी बालरुग्णांच्या पुढील सेवेच्या अत्यावश्यक सूचना देवूनच दाखल रुग्णांना सोडण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. 

राज्य सरकार व पालिकेकडून वाडिया रुग्णालयाला अनुदान मिळते. मात्र, पालिका व राज्य सरकार अशी मिळून 230 कोटी थकल्याने वाडियातील सगळ्याच रुग्णांना डिस्चार्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुदान, निधी, आणि साहित्यही उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार होत नाहीत. त्यामुळे प्रवेश

देऊन पुढील उपचारांवरील सवाल रुग्णालय प्रशासनाला छळत आहे. त्यामुळे नवीन रुग्ण घेत नाहीत. पालिकेने रुग्णालयाला 14 कोटी रुपयांची मदत केली. मात्र, ती सर्व रक्कम रुग्णालयातील 1,500 कामगाऱयांच्या पगार, काही थकबाकीच्या †िहशेबात संपली. त्यामुळे दाखल असलेल्या रुग्णांना विनवणी करुन डिस्चार्ज करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या वेळी मिळालेल्या सरकारच्या अनुदानातून कर्मचाऱयांचे पगार देण्यात आले. परंतु, इतर आणि आगामी खर्चाचे काय असा सवाल येथील उपस्थित करत आहेत. त्यामुळे रुग्णालय वाचवायचे असेल तर ही रक्कम द्यावी, अशी मागणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात आली. तर वाडिया वाचविण्यासोबत अनुदान आणि अन्य मागण्यांसाठी लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या नौरोसजी वाडिया कमिटीकडून सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया

माझी मुलगीवर वाडियामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, आम्हाला येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्याने मी डिस्चार्ज स्वीकारला नाही. डॉक्टरांना मुलीवर वाडियातच उपचार करण्याबाबतची विनंती रडून केली आहे.

– उदय सिंग, मुलीचे वडील

प्रतिक्रिया

बालरुग्णांचे हाल होऊ देणार नाही!

रुग्णांप्रती असलेल्या जबाबदारीमुळे बालरुग्णांचे हाल होऊ देणार नाही. जे रुग्ण बाहेर सेवा घेऊ शकतात अशांना समुपदेशन करुन डिस्चार्ज देण्यात येत आहे. तर आयसीयूमधील रुग्णांना खाटा उपलब्ध करुन त्यांना †िडस्चार्ज करण्यात येत आहे.  रुग्णांचे हाल होऊ देऊ नयेत असे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, नवे रुग्ण थांबविण्यात आले आहेत.

– डॉ. निरंजन गा. सीईओ. वाडिया रुग्णालय.

Related posts: