|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » अमेरिकेत हिमवादळ, 11 ठार

अमेरिकेत हिमवादळ, 11 ठार 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

अमेरिकेच्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिमवादळ, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. वादळाचा सर्वाधिक प्रभाव टेक्सास, ओकाहोमा, शिकागो आणि डलास राज्यांमध्ये दिसून आला आहे. या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शिकागोच्या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 1200 हून अधिक विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर ओकाहोमा आणि अरकंसासमध्ये पुरामुळे अनेक महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

टेक्सासमध्ये शनिवारी एक पोलीस अधिकारी आणि एका बचाव कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. तर ओकाहोमामध्ये पुराच्या पाण्यात बुडाल्याने एकाला जीव गमवावा लागला. लुसियाना येथे घर कोसळल्याने वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला आहे. तर लोवामध्ये ट्रक उलटल्याने एक जण मृत्युमुखी पडला आहे.

टेक्सासमध्ये वीजसेवा ठप्प झाल्याने हजारो लोकांना फटका बसला आहे. तर अलबामा येथे सुमारे 85 हजार लोकांवर वीजेशिवाय राहण्याची वेळ आली आहे. वादळ अधिक तीव्रतेचे असल्याने मिसौरी, ओकाहामा आणि अरकंसासमध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले असून कित्येक घरांचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या हवामान विभागाने अरकंसास, टेनेसी, मिसिसिपी, मिसौरी, इलिनोइस आणि इंडियाना प्रांतात मुसळधार पावसानंतर पुराचा इशारा दिला आहे. शिकागोमध्यही पुराचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर-पश्चिम इलिनोइसनजीकच्या भागांमध्ये हिमवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात 218 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर इलिनोइस आणि शिकागोमध्ये रविवारी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

Related posts: