|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; 4 जखमी

इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; 4 जखमी 

 ऑनलाईन टीम / तेहरान :

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष शिगेला पोहचला असतानाच इराणने पुन्हा एकदा इराकमधील बलाद येथे अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.

इराणने अमेरिकेच्या बलाद येथील लष्करी तळावर आठ रॉकेट डागली आहेत. त्यामध्ये जखमी झालेल्यात दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱयांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात इराकचा मेजर जनरल कासिम सुलेमानचा खात्मा झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील वाद विकोपाला पोहचले आहेत. त्यावर इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर 12 क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा इराणने रॉकेट हल्ला केला आहे. अल बलाद एअरबेस इराकमधील एफ-16 विमानांचा मुख्य तळ आहे. येथील तळावर अमेरिकन हवाई दल आणि कंत्राटदारांचे एक पथकही आहे.

Related posts: