|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » अनुष्का उतरणार क्रिकेटच्या मैदानात……..

अनुष्का उतरणार क्रिकेटच्या मैदानात…….. 

 

ऑनलाईन /टीम मुंबई

आजवर अनेक लोकप्रिय खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी,मिल्खासिंग, मेरी कोम यासारख्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाल्यानंतर लवकरच आता एका महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून  यामध्ये झुलनची भूमिका अनुष्का साकारणार आहे. झुलन गोस्वामीला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा मानलं जातं. ‘झीरो’ चित्रपटानंतर अनुष्का शर्मा या बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

Related posts: