|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » चर्चा ‘फरहान-शिबानीच्या’ लग्नाची…………

चर्चा ‘फरहान-शिबानीच्या’ लग्नाची………… 

 

ऑनलाईन टीम / मुंबई
जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. फरहान सध्या त्याच्या आगामी ‘तूफान’ चित्रपटात व्यस्त आहे . या चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर हे दोघं लग्न करणार असल्याची माहिती मिळते. चाहत्यांमध्ये या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगत आहे .

 

मात्र फरहानचे वडील आणि दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी ,फरहान लग्न करतोय हे माहिती नसल्याचे सांगितलं . मुलं बरच काही लपवतात ,मी शिबानीला बऱ्याच वेळा भेटलोय. ती खूप चांगली आणि गोड मुलगी आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.फरहानचा ‘तूफान’ २०२०च्या अखेरपर्यंत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याचदरम्यान हे दोघं लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या दोघांनीही लग्नाची तयारी आतापासूनच सुरु केल्याचं दिसून येत आहे.

Related posts: