|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » भाषा संवर्धनाचे एमसीई सोसायटीचे प्रयत्न पथदर्शक : हर्षद जाधव

भाषा संवर्धनाचे एमसीई सोसायटीचे प्रयत्न पथदर्शक : हर्षद जाधव 

ऑनलाइन टीम  / पुणे :   

एम.सी.ई. सोसायटीच्या  स्पोकन मराठी  ऍकॅडेमी तर्फे मराठी संवर्धन पंधरवड्याची सांगता आज आझम कॅम्पस येथे करण्यात आली. यावेळी मराठी भाषा विभागाचे अवर सचिव हर्षद जाधव, विश्वकोष निर्मिती मंडळाचे सहायक सचिव श्यामकांत देवरे,  कक्ष अधिकारी राजश्री बापट, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.लतिफ मगदूम, मशकुर शेख, अब्बास शेख उपस्थित होते. डॉ.लतीफ मगदूम हे  कार्यक्रमाच्या  अध्यक्ष स्थानी होते.
हर्षवर्धन जाधव म्हणाले, ‘ मराठी भाषा जतनाचे प्रयत्न महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये होत आहे. त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मंत्रालयात देखील तीन दिवस पंधरवडा साजरा केला जातो.  मुंबईत हिंदी, इंग्रजी भाषेचे वर्चस्व झाले आहे. त्या मानाने येथील प्रयत्न आमच्या विभागाचा उत्साह वाढविणारा आहे.हे प्रयत्न पथदर्शक आहेत.
श्यामकांत देवरे म्हणाले,’ राज्यभरातील कार्यक्रमात येथील कार्यक्रम सरस ठरला. मराठी भाषा विभागाला यातून ऊर्जा प्राप्त झाली. 

Related posts: