|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » जर्मनीच्या केर्बरची विजयी सलामी

जर्मनीच्या केर्बरची विजयी सलामी 

वृत्तसंस्था / सिडनी :

सोमवारपासून सुरू झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील पहिल्या ऍडलेड आंतरराष्ट्रीय खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीची माजी टॉप सीडेड अँजेलिक केर्बरने एकेरीत विजयी सलामी देताना चीनच्या क्यूयांगचा पराभव केला.

2016 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱया केर्बरला गेल्या आठवडय़ात ब्रिस्बेन येथे झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टोसूरकडून पराभव पत्करावा लागला होता. ऍडलेड स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात केर्बरने क्यूयांगचा 6-1, 6-3  असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. ऍडलेडची ही स्पर्धा पुरूष आणि महिला अशा दोन गटामध्ये खेळविली जात आहे. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टॉमलेजानेव्हिकने कझाकस्तानच्या पुतीनसेव्हाचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव केला. स्वीसच्या बेनसिकने कॅसेटकिनाचा 6-4, 6-4, अमेरिकेच्या केनिनने गोलुबेकचा 6-0, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

पुरूषांच्या विभागात अमेरिकेच्या सॅम क्वेरीने फान्सच्या बॅरेरीचा 6-7 (4-7), 6-2, 7-6 (7-5), ब्रिटनच्या इव्हान्सने अर्जेंटिनाच्या लॉनडेरोचा 6-2, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. ऑस्ट्रेलियाचा डी मिनॉर याने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डकवर्थने डेलबोनिसचा 6-4, 6-4, फ्रान्सच्या चार्डीने आपल्याच देशाच्या सिमॉनचा 6-3, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related posts: