|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा समाजकल्याण समितीत वादंग

मनपा समाजकल्याण समितीत वादंग 

प्रतिनिधी / सांगली

महापालिकेच्या समाजकल्याण समितीमध्ये सोमवारी सायंकाळी सभापती सौ. स्नेहल सावंत व नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. सभापती स्नेहल सावंत या सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कारभार करतात. त्यांनी पाच महिन्यांत समितीची सभाच घेतली नाही. त्यामुळे त्यांचे सभापतीपद रद्द करा अशी मागणी थोरात यांनी केली. दरम्यान, सावंत यांच्या सुरक्षारक्षकांनी धमकी दिल्याचा आरोप थोरात यांनी केल्याने मनपातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

धमकीप्रकरणी थोरात यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा तसेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही महापालिकेत जमा झाले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर ही कर्मचाऱयांसह अखेर पदाधिकाऱयांनी सभापती सावंत व नगरसेवक थोरात यांच्या वादाद मधस्थी करीत वादावर पडदा टाकला. दरम्यान, याबाबत बोलताना नगरसेवक थोरात म्हणाले, सभापती सावंत समाजकल्याण समिती सदस्यांना निधी नियोजनात विश्वासात घेत नाहीत. सावंत यांनी गेल्या पाच महिन्यांत सभाच घेतली नाही. वास्तविक माझ्या प्रभागातील मागावसवर्गीय भागात सांडपाणी शिरले आहे. ते हटविण्याबाबत वांरवार मागणी केली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही. जो पर्यंत सांडपाणी हटत नाही, तोपर्यंत पादत्राणे न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून अनवाणी फिरत आहे. याबाबत सभेत सावंत यांना एकूणच कामकाजपद्धती, सभा न घेतल्याबद्दल विचारणा केली. सोसायटय़ांमार्फत कामे न करता निविदा पद्धतीने केल्यास निधी वाचतो. पण, परस्पर तुम्ही ही कामे कशी ठरविता असे वाचरले असता, वाद वाढला. मला कोणत्याच विषयावर प्रश्न विचारायचे नाहीत असे सावंत यांनी सुनावले. याच दरम्यान त्यांच्यासोबत असणाऱया सुरक्षा रक्षकांनी पुढे येत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सभेत हे गुंड कसे, याबाबत मी नगरसचिव आणि संबंधित अधिकाऱयांना विचारल असता, त्यांनीही हात वर केले. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे मोबाईलवरून तक्रार करताच संबंधित ‘रक्षक’ बाहेर गेले. जाता-जाता त्यांनी मला बघून घेण्याची धमकी दिल्याचे थोरात यांनी सांगितले.

या प्रकारामुळे महापालिकेत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.  शर्मा यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अजय सिंदकर फौजफाटय़ासह महापालिकेत दाखल झाले. पोलिसांनी चौकशी करत तिथे असणाऱया समर्थक व विनाकारण घुटमळणाऱयांना हाकलून दिले. हा प्रकार समजताच भाजपा कोअर कमिटीचे नेते सुरेश आवटी, महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, भाजपाचे गटनेते युवराज यांनी तात्काळ समझोत्यासाठी हालचाली केल्या. सभापती सावंत व नगरसेवक थोरात यांच्यासह समाजकल्याण समितीतीतील सदस्यांसमवेत बैठक घेतली. ‘तुमची कामांबद्दल तक्रार असेल तर आमच्याकडे तक्रार करा. तुमच्या प्रभागातील कामे तुम्हालाच विचारून निश्चित करू’ असे आश्वासन त्यांनी नगरसेवक थोरात यांना दिले. त्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला.

ही खासगी संस्था नव्हे

स्नेहल सावंत या सलग पाच वर्षे समाकल्याण समितीच्या सभापती आहेत. त्यांनी सर्व सदस्यांना समान न्याय आणि निधीबाबत विश्वासात घेऊन कामे निश्चित करायला हवीत. तसे न करता मनमानी पध्दतीने ‘डमी’ सभापती नेमून परस्पर कामांचे नियोजन करतात. याबद्दल जाब विचारला तर त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. याचे उत्तर द्यायला आम्ही ‘पगारी’ नेमले आहे असे त्या म्हणाल्या. पगारावर माणसे ठेवायला ही काय खासगी संस्था आहे का? असा सवालही थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts: