|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » पुणे-बेळगाव रेल्वे सेवा 9 फेब्रुवारीपासून

पुणे-बेळगाव रेल्वे सेवा 9 फेब्रुवारीपासून 

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुणे ते बेळगावदरम्यान येत्या 9 फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा सुरू होत आहे. या मार्गावर धावणाऱया जनशताब्दी एक्सप्रेसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले.

9 फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकावर या गाडीचे उद्घाटन होणार असून ती गाडी दररोज या मार्गावर धावणार आहे. पुण्यातून सकाळी 6 वाजता ही गाडी सुटणार असून बेळगाव येथे दुपारी 1 वाजता पोहोचेल. पुणे-बेळगाव अंतर 417 किलोमीटरचे असून केवळ सात तासात ही गाडी ते अंतर कापणार आहे.

सद्यःस्थितीत पुणे-बेळगावदरम्यान एकही रेल्वे थेट धावत नाही. त्यामुळे इतर गाडय़ांच्या प्रवासाने बेळगावला जाण्यास 8 ते 9 तासांचा कालावधी लागतो. मात्र, ही गाडी जलद असणार आहे. या मार्गावर एकूण 9 स्थानके असतील. तसेच या एक्सप्रेसचा तिकीट दर इतर एक्सप्रेसप्रमाणेच असणार आहे.

Related posts: