|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » निर्भया : क्युरेटिव्ह याचिका फेटाळली, दोषींना 22 जानेवारीला फाशी

निर्भया : क्युरेटिव्ह याचिका फेटाळली, दोषींना 22 जानेवारीला फाशी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती भूषण यांच्याकडून 18 डिसेंबरलाच पुनर्विचार याचिका फेटाळली होती. ज्यानंतर पटियाला हाऊसच्या ट्रायल न्यायालयाकडून दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यासंबंधीचा वॉरंट जारी करण्यात आला होता. फाशीची शिक्षा झालेल्या दोन दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी न्यायसुधार याचिका दाखल केली होती. त्यावर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावली.

 

 

Related posts: