|Monday, January 27, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जोडले अक्षरांशी अक्षय नाते

हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जोडले अक्षरांशी अक्षय नाते 

ऑनलाइन टीम  / पुणे  :

सुंदर अक्षर हाच खरा दागिना असे नेहमी म्हटले जाते. हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग घेत सुंदर हस्ताक्षराद्वारे विद्यार्थ्यांनी आपली लेखन कला कागदावर उमटवली. जागतिक हस्ताक्षर दिनाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांनी सुलेखन माझे कर्तव्य आहे, अशी प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून अक्षरांशी अक्षय नाते जोडले. 

अक्षररसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस टेडर्स यांच्यातर्फे जागतिक सुलेखन दिनानिमित्त सुलेखन विविध शाळांंमध्ये २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी सुलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ४ थी ते ९ वी पर्यंतच्या स्पर्धेचे उद्घाटन अप्पा बळवंत चौक येथील नू. म. वि. प्रशालेत झाले. यावेळी अक्षररसिक सुलेखन वर्गाचे संस्थापक शैलेश जोशी, व्हिनस टेÑडर्सचे संस्थापक सुरेंद्र करमचंदानी, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका प्राची गुमास्ते उपस्थित होते. 

शैलेश जोशी म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात सुंदर लेखनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व नव्या पिढीला समजावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुंदर अक्षर ही विद्यार्थ्याची ओळख असते. अक्ष म्हणजे डोळे आणि र म्हणजे रम्य. डोळ्याने पाहिल्यावर जी गोष्ट सुंदर दिसते ते म्हणजे अक्षर. अक्षराचे महत्व अजरामर आहे. सुंदर अक्षर हा दागिना आहे, याचा सराव केल्यास हा दागिना अधिक खुलून दिसेल. 

पुणे शहरातील नू. म. वि. मुलांची प्रशाला, हुजूरपागा प्रशाला, महेश विद्यालय मराठी व इंग्रजी माध्यम, भावे हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल टिळक  रस्ता, रमणबाग प्रशाला, डी. ई. एस स्कूल, गोळवलकर हायस्कूल, अभिजात एज्युकेशन प्रशाला कर्वेनगर, बालशिक्षण मंदिर, जोग प्रशाला मराठी व इंग्रजी माध्यम, रोझरी स्कूल वानवडी, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, अहिल्यादेवी प्रशाला आदी शाळांमध्ये ही स्पर्धा एक आठवडा घेण्यात येणार आहे. सहभागी शाळेकडून या स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतील ३ बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात येणार आहे. यामधून आयोजकांतर्फे प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्रक पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. भरत सुरसे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज सुतार यांनी आभार मानले. 

Related posts: