|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » निर्मला गोगावले यांना माऊली पुरस्कार जाहीर

निर्मला गोगावले यांना माऊली पुरस्कार जाहीर 

ऑनलाइन टीम  / पुणे  : 

स्व. अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे माऊली पुरस्कार व प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिवदर्शन येथील मुक्तांगण शाळेच्या सभागृहात होणार आहे.
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या मातोश्री निर्मला अशोक गोगावले यांना माऊली पुरस्काराने तर स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशनच्या आपलं घर संस्थेला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
विराज मोहिते म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि सह-पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे उपस्थित राहणार आहेत. स्व. अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील कर्तृत्ववान मातेला व उपेक्षितांच्या शिक्षणासाठी काम करणा-या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. 

विक्रांत मोहिते म्हणाले, पहिल्या वर्षी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्या मातोश्री मंगलताई नांगरे-पाटील यांना माऊली पुरस्काराने तर शिक्षणासाठी मदत करणा-या दिशा संस्थेला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यानंतर बी.व्ही.जी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड व भारतीय ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या मातोश्री मीना कुंटे यांना माऊली पुरस्काराने तर अंध मुलांसाठी संगणकीय शिक्षण देणारी नॅशनल असो. फॉर वेलफेअर फिजीकली चॅलेंज संस्था व अंध मुलांसाठी उच्च शिक्षण देणारी निवांत अंध मुक्त विकासालय यांना प्रेरणा पुरस्काराने याआधी सन्मानित करण्यात आले होते.

Related posts: