|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » टिकटॉकसाठी व्हिडीओ बनवताना बंदूकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू

टिकटॉकसाठी व्हिडीओ बनवताना बंदूकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू 

ऑनलाइन टीम / बरैली : 

टिकटॉक वर व्हिडिओ बनवण्याच्या सवईने अनेक लोकांचे जीव घेतले आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात बरैली घडली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणाने टिकटॉक व्हिडिओसाठी शुटिंग करताना चक्क आपल्या हातातील पिस्तूलमधून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. बरैलीतील हाफिजगंजमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव कुमार असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बारावीत शिकत होता. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. महाविद्यालयातून घरी आल्यावर केशवने आईकडे पिस्तूल मागितले. सुरुवातीला आईने पिस्तूल देण्यास नकार दिला. पण मुलगा खूपच मागे लागल्याने आईने त्याला पिस्तूल दिले. त्यानंतर आई स्वयंपाकघरात काम करीत असताना दुसऱया खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने आई पळत पळत त्या खोलीत गेली. त्यावेळी आपला मुलगा रक्ताच्या थारोळय़ात पडला असल्याचे आईला दिसले. केशवला लगेचच बरैलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

टिकटॉक व्हिडिओसाठी खांद्यावर पिस्तुल घेतल्याचा व्हिडिओ तो शूट करीत होता. त्यावेळीच त्यातून गोळी चालविली गेली आणि ती लागल्याने केशवचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

 

Related posts: