|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सूर संजीवन म्युझिक थेरपीचा पदविका प्रदान समारंभ संपन्न

सूर संजीवन म्युझिक थेरपीचा पदविका प्रदान समारंभ संपन्न 

ऑनलाइन टीम / पुणे : 

सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टचा संगीतोपचाराचा द्वितीय पदविका प्रदान समारंभ आज एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे संपन्न झाला. या समारंभाच्या वेळी सूर संजीवन म्युझिक थेरपीचे संस्थापक पं. शशांक कट्टी, प्रसिध्द गायक शौनक अभिषेकी, सतारवादक चिंतन कट्टी, सौ चित्रा कट्टी, संगीता सांगवीकर, विद्यार्थी आणि श्रोते मोठय़ा संख्येन उपस्थित होते.

या अभ्यासामाचा द्वितीय पदविका अभ्यासाम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या गायक, डॉक्टर्स, वादक हिलर्स अशा विद्यार्थ्यांना सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टचे संस्थापक व प्रसिध्द सतारवादक पंडित शशांक कट्टी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मामँटो देण्यात आले.

सुप्रसिध्द सतारवादक चिंतन कट्टी यांचे सतारवादन व शास्त्राrय संगीत गायक शौनक अभिषेकी यांचे गायन झाले. त्यांनी शास्त्रीय रागांबरोबरच पंडीत शशांक कट्टी यांनी संगीत बध्द केलेली पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायिलेली सावळे सुंदर रुप मनोहर राहो निरंतर ह्रदयी माझे यांचे गायन झाले. त्यांना सिध्देश बिचोलकर (संवादिनी), स्वप्नील भिसे (तबला) सत्यजित बेडेकर, राज शहा यांनी सुरेख साथ दिली. या मंत्रमुग्ध करणाऱया संगीत कार्यक्रमास रसिकांनी चांगली दाद दिली.

 

Related posts: