|Monday, January 27, 2020
You are here: Home » विविधा » कोकणच्या सुनबाई ‘मेडि क्वीन’

कोकणच्या सुनबाई ‘मेडि क्वीन’ 

डॉ. गीता चंदशेखर कदम ठरल्या ‘फॅशन आयकॉन’

पुणे / प्रतिनिधी :  

रत्नागिरी जिल्हय़ातील रामपूरच्या (ता. चिपळूण) सुनबाई असलेल्या डॉ. गीता चंद्रशेखर कदम यांनी ‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र 2020, फॅशन आयकॉन’ हा किताब पटकावत कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

ही सौंदर्य स्पर्धा बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून 230 हून अधिक डॉक्टर्सनी सहभाग नोंदविला. अंतिम फेरीकरिता एकूण 65 डॉक्टरांची निवड करण्यात आली. यात बालेवाडीतील होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉ. गीता चंद्रशेखर कदम यांनी बाजी मारली. डॉ. कदम या चिपळूणमधील रामपूरच्या स्नुषा असून, त्यांचे माहेर नगर जिल्हय़ात आहे. होमिओपॅथीबरोबरच मेडिकल योगा थेरपीद्वारेही त्या रुग्णांना मार्गदर्शन करतात.

स्पर्धेचे आयोजन डॉ. रितू लोखंडे, डॉ. मनीषा गरूड, डॉ. प्रेरणा बेरी आणि डॉ. ज्योती माटे यांनी केले. अभिनेते सुशांत शेलार व अभिनेत्री इलाक्षी मोरे यांच्या उपस्थितीत अंतिम फेरी पाडली. त्यानंतर ‘फॅशन आयकॉन’ किताब देऊन डॉ. गीता कदम यांना गौरविण्यात आले.

Related posts: