|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » दीपिकाच्या जेएनयू भेटीवर मेघना गुलजार म्हणाल्या…

दीपिकाच्या जेएनयू भेटीवर मेघना गुलजार म्हणाल्या… 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी तिच्यावर टीका केली. तर काहींनी तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बंदी आणण्याचीही मागणी केली.

या सर्व वादावर आता ‘छपाक’ ची दिग्दर्शिका मेघना गुलजारने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवता आलं पाहिजे, असं म्हणत मेघना गुलजारने दीपिकाला पाठिंबा दिला.

त्या म्हणाल्या, हा दीपिकाचा वैयक्तिक निर्णय होता. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमी वेगळे ठेवायला हवं. एखाद्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात काय केले आणि एखाद्या चित्रपटात व्यावसायिक म्हणून काय केले आहे, या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहणे आवश्यक आहे. चित्रपटातील कथानकाला आणि त्यातील संदेशाला महत्त्व देणे गरजेचे आहे.

 

Related posts: