|Monday, January 27, 2020
You are here: Home » संवाद » लोण्याचा गोळा

लोण्याचा गोळा 

दुधावर आलेल्या स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे, साधारणपणे आंबट दह्याचे, विरजण लावले की सायीचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृ÷भागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.

थालीपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱया लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपीठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. पण आजकालच्या लो फॅट आहाराच्या युगामध्ये लोणी खाण्याची सवयही लुप्त झाली आहे.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये घरचे ताजे पांढरे शुभ्र लोणी अगदी प्राचीन काळापासून आहे. पण अलीकडच्या काळामध्ये घरच्या लोण्याची जागा आकर्षक दिसणाऱया ट्रान्स फॅट फ्री किंवा लो फॅट बटरने घेतली आहे. उत्तम आरोग्य आणि वजन घटविण्याचे वायदे, हे बटर वापरणाऱया ग्राहकाला केले जात असतात. बाजारामध्ये मिळणाऱया बटरमध्ये आणि घरच्या लोण्यामध्ये मूलभूत फरक ह्यातील पौष्टीकतेचा आहे. बाजारामध्ये मिळणाऱया पिवळय़ा बटरमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. तसेच ह्यामध्ये ट्रान्स फॅटस्, शुगर्स आणि कलरिंग एजंट्सचाही समावेश असतो.

त्या उलट घरच्या ताज्या लोण्यामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक अनेक तत्वे आहेत. तसेच यामध्ये अ आणि ड जीवनसत्वेही आहेत. कॅलरीजबद्दल बोलायचे झाले, तर बाजारामध्ये मिळणारे बटरचे निरनिराळे ब्रँड, कॅलरीरहित लोण्याचा वायदा करीत असतात. पण ह्यामध्ये सिंथेटिक फॅट असतात, ज्यांच्या नियमित सेवनाने वजन वाढू लागते. पण घरच्या ताज्या लोण्यामध्ये मात्र चांगले फॅट्स असून, हे वजन घटविण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास सहाय्यक आहेत.

लोण्याच्या सेवनामुळे त्वचेशी निगडीत अनेक समस्यांचे समाधान होते. जर त्वचा कोरडी पडत असेल, त्वचेवर वारंवार खाज सुटून पुरळ येत असेल, तर आपल्या आहारामध्ये लोण्याचा नियमित समावेश करा. लोण्यामध्ये इ जीवनसत्व असल्याने हे त्वचेला पोषण देणारे आहे. तसेच लोण्याच्या नियमित सेवनाने सांध्यांना वंगण मिळते आणि सांधेदुखी बरी होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्यांना संधिवात आहे, त्यांनी दररोज एक चमचा ह्याप्रमाणे, घरच्या लोण्याचे सेवन करावे. लोण्यामध्ये असलेले अराकिडॉनिक ऍसिड मेंदू सजग आणि सक्रीय राहण्यास मदत करणारे आहे. प्राचीन काळामध्ये लोणी आहारामध्ये समाविष्ट केले जात असल्याने, त्या काळातील लोक ‘मेंटल मॅथ्स’ किंवा बुद्धी सामर्थ्यावर गणिते किंवा तोंडी हिशोब करण्यात पटाईत असत, असे आहारशास्त्रज्ञांचे मत आहे.

Related posts: