|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक वर्षात 16 लाख रोजगार घटणार?

एक वर्षात 16 लाख रोजगार घटणार? 

ईकोरॅपच्या अहवालात माहिती सादर

वृत्तसंस्था / मुंबई

सरकारी माहितीच्या आधारे मागील आर्थिक वर्षाच्या (2018-19) तुलनेत 2019-20 मध्ये रोजगारांमध्ये जवळपास 16 लाखाच्या संख्येने घट होण्याचे संकेत स्टेट बँकेचा रिसर्च अहवाल ईकोरॅपने मांडले आहेत. अहवालात मांडण्यात आलेल्या निरिक्षणामधून अर्थव्यवस्थेत सलगची आलेल्या घसरणीच्या कारणांमुळे रोजगार क्षेत्र चिंतेत राहिले आहे.

यामध्ये आसाम, बिहार, राजस्थान, ओडिसा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत पैसे पाठविण्यात (रेमिटेंस) घसरण झाली आहे. यावरुनच कंत्राटी काम करणाऱया क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मागील पाच वर्षात उत्पादनाचा वृद्धीदर 9.4 टक्के ते 9.9 टक्क्यांच्या मध्ये राहिला आहे. या आकडेवारीमुळे कर्मचाऱयांची बडती कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारी नोकऱयात घट

2018-19 या कालावधीत देशात 89.7 लाख रोजगार वाढले आहेत. परंतु 2019-20 या कालावधीत रोजगारात 15.8 लाख या संख्येने कमी होण्याचा अंदाज ईपीएफओच्या आकडेवारीत मांडला आहे.  ईपीएफओच्या आकडेवारीनुसार 15 हजारपर्यंत वेतन असणाऱया कामांचा यात समावेश होण्याची शक्यता आहे. तर ईकोरॅपच्या अहवालानुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2019 पर्यंत 43.1 लाख नवीन कर्मचाऱयांची जोडणी होऊ शकते. याचा अंदाज घेत आर्थिक वर्ष समाप्त होईपर्यंत (मार्चपर्यंत) हा आकडा 73.9 लाख होण्याचे अनुमान मांडले आहेत. 

कंत्राटी कामात घट

कंपन्यांमधील कंत्राटी कामात आर्थिक मंदीच्या कारणांमुळे आणखीन घट होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांत एका राज्यातून दुसऱया राज्यात रोजगाराच्या शोधासाठी वेग वाढल्याचे पहावयास मिळाले आहे.   

बेरोजगारीचा दर

13 जानेवारी 2020 पर्यंत देशातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे. शहरी भागात 9.4 टक्के आणि ग्रामीण भागात हा दर 6.7 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. डिसेंबर 2019 पर्यंत राज्यांच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बेरोजगारीचा दर 28.6 टक्के त्रिपुरामध्ये आहे. दुसऱया स्थानी हरियाणा 27.6 टक्क्यांवर आणि तिसऱया क्रमाकांवर हिमाचल प्रेदश असून यांचा बेरोजगारीचा दर 20.2 टक्क्यांवर असल्याची नेंद आर्थिक संशोधन करणारी संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात करण्यात आली आहे.

Related posts: