|Monday, January 27, 2020
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल 19 जानेवारीपासून

ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल 19 जानेवारीपासून 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ऍमेझॉन इंडियाकडून भारतात ‘ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल’ची घोषणा करण्यात आली आहे. सदरचा सेल 19 जानेवारी ते 22 जानेवारी 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. ऍमेझॉनचे सदस्य असणाऱया ग्राहकांना 18 जानेवारीपासून या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीच्या विशेष सवलतीच्या विक्रीत स्मार्टफोन, कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौदर्य, घरासंदर्भातील उत्पादने, टीव्ही, दैनदिन वापरातील वस्तूंची विक्री यामध्ये करण्यात येणार आहेत. स्टेट बँक क्रेडिट कार्ड आणि इएमआय यांच्यामाध्यमातून 10 टक्क्यापर्यंत सवलत ग्राहकांना मिळणार आहे. यासोबतच बजाज फायनान्स, ऍमेझॉन पे , आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यावरही सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Related posts: