|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

24 जानेवारीला शनिचा मकरेत प्रवेश… पूर्वार्ध

बुध. 15 ते 21 जानेवारी 2020

ग्रहमालेतील बलाढय़ ग्रह व ब्रह्मांडाचे न्यायाधीश मानले गेलेले शनि महाराज येत्या 24 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. रवि, चंद्र व मंगळ या तीन ग्रहांचे आधिपत्य असलेल्या या मकर राशीत शनीचा प्रवेश म्हणजे जरा त्रासदायकच समजावा, कारण या तिन्ही ग्रहांशी शनिचे म्हणावे तसे चांगले सख्य नसते. त्यामुळे शनि या राशीत तितकासा खूष नसतो. त्यामुळे या राशीत प्रवेश म्हणजे युद्धाची नांदीच म्हणता येईल. ज्या ज्या वेळी शनि शत्रुच्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या त्या वेळी जगात हाहाकार, अपघात, दुर्घटना, ज्वालामुखीचे स्फोट, जागतिक युद्धे, जमीन दुभंगणे, त्सुनामी लाटा येणे, समुद्रात काही शहरे बुडणे अथवा समुद्राखालील काही भाग वर येणे, ठरलेली लग्ने मोडणे, आगीच्या दुर्घटना, भयानक स्फोटक व त्यात असंख्य मृत्यू, भूकंप तसेच नैसर्गिक प्रलयासारख्या घटना घडतात व गेल्या कित्येक दिवसापासून याचे अनुभवही येत आहेत. मी मी म्हणणाऱयाचं गर्वहरण होते. गुर्मित, घमेंडीत व श्रीमंतीच्या लाटेत हवेत तरंगत असणारे सरळ खाली येतात. या कालखंडात मस्तक, डोळय़ांचे विकार, दृष्टीदोष, अंधत्व, संधीवात, काचबिंदू व डोळय़ांना इजा होण्याची शक्मयता असते. काही जणांची आर्थिक भरभराट होते तर काही जणांना हा शनि रसातळाला पोचवितो. उपजीविकेचे मार्ग बदलतात. कोर्ट, पोलीस प्रकरणाशी संबंध येतो. राजकारणात व समाजकारणात असलेल्यांना हा शनि एकतर अत्युच्च पदावर नेईल अथवा दाणदिशी खाली आपटेल. जोतिषशास्त्रावर प्रभुत्व असलेला शनि हा मुळात वाईट नाही, तो कर्माचा अधिपती आहे. ज्याचे जसे कर्म असेल त्यानुसार  चांगले वाईट फळ तो देईल. त्यात तो  कोणतीही हयगय करणार नाही. श्रीमंत, गरीब, हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, लिंगायत, शीख अथवा दलित असा भेदभाव त्याच्याकडे नाही. ‘जे कराल, ते भराल.’ कितीही गुप्तपणे पापे करा, त्याचे फळ शनि देणारच. माणसाच्या पाप-पुण्याईचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त म्हणजे शनि. मृत्यूवर त्याचा अमल आहे. आपण जरी चांगले असलो तरी आपले वाडवडिल, आजोबा, पणजोबा यांनी जी काही बरी-वाईट कृत्ये केलेली असतील, त्याचे फळ हा शनी देतो. शनिची साडेसाती म्हणताच मी मी म्हणणारेही दचकतात. ज्याला साडेसाती वाईट जाते, त्याचे कारण स्वत: अथवा वाडवडिलांच्या कर्मात स्पष्ट दिसून येते. साडेसाती असतानाच अनेकजण यशाच्या सर्वोच्च शिखरावर चढलेले पहाण्यात आहेत. वृश्चिकेची साडेसाती पूर्णपणे संपते तर धनू, मकर, कुंभ या तीन राशीना साडेसाती राहील. कुंभेला साडेसाती सुरू होत आहे. मिथुन व तुळेला अडीचकीची शनिपीडा राहील. शनि बदलल्यावर ताबडतोब त्याची फळे मिळत नाहीत तर शेवटच्या सहा महिन्यात त्याचे अनुभव विशेष प्रकर्षाने जाणवतात. एका राशीत त्याचे वास्तव्य अडीच वर्षे असते. ज्या राशीत तो असेल, त्याच्या पुढील व मागील राशीवर त्याचा बरा-वाईट प्रभाव पडतो. त्याशिवाय चवथा, पाचवा, सातवा या स्थानातील शनिचाही त्रास होता.s शनिची पूजाअर्चा, जपजाप्य व शांती हे विषय प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कमी जास्त फळ देतात. त्याहीपेक्षा स्वत:चे कर्म स्वच्छ ठेवणे कुणावर अन्याय न करणे, दैनंदिन कामे व्यवस्थित करणे, कुणालाही अपशब्द बोलून वाईटपणा घेऊ नये वगैरे बाबींकडे लक्ष दिल्यास शनिचा कोणताही त्रास होत नाही. मेष, वृश्चिक, कर्क व सिंह या राशीना शनीचे दर्शन-पूजन अजिबात चालत नाही हे लक्षात ठेवावे.

मेष

शनि स्वराशित दशमात आलेला आहे. नोकरी व्यवसायात उन्नती होईल. सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात असाल तर लाभदायक योग. सर्व सरकारी कामे होऊ लागतील. व्यवस्थित आयसाधन करून घर बांधल्यास निश्चितच लक्ष्मीची कृपा होईल. मानसन्मान, धनदौलत सर्व काही प्राप्त कराल. दुसऱयांचे भले कराल, त्याचा फायदा तुम्हाला भरभराटीच्या रुपाने होईल. जमीन मालमत्तेसाठी प्रयत्न करा. हमखास यश मिळेल. चारचाकी वाहन घेण्याची संधी मिळेल.


वृषभ

देवांचे सरन्यायाधीश शनि महाराज तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब पाहून ऐश्वर्यलाभ. आरोग्यात सुधारणा, प्रवास, शत्रुना नामोहरम करणे, द्रव्यलाभ, मुलाबाळांचा भाग्योदय अशा शुभ घटना घडवतील. एखादे प्रेमपात्र नव्याने आयुष्यात येण्याची शक्मयता आहे. भाग्यस्थान हे न्यायस्थान आहे. तुमच्या हातून कुणावरही अन्याय झालेला नसेल, कोणतेही व्यसन नसेल, घरातील वातावरण शुद्ध व सात्विक असेल तर भाग्यस्थ शनि तुमचे सर्व प्रकारे रक्षण करील.


मिथुन

मृत्यूस्थानी शनि आलेला आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. भागीदारी व्यवसायात लाभ. नोकरीत उत्कर्ष होईल. अपघाताची भीती राहील. या शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी नशेपासून दूर रहाणे चांगले ठरेल. साप, विंचू यापासून सावधगिरी बाळगा. कुणालाही या शनिच्या कालखंडात दानधर्म केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील. तुमचे वर्तन जितके स्वच्छ व न्यायी असेल, त्या प्रमाणात शनि तुमचे सर्व संकटातून रक्षण करील.


कर्क

मकरेचा शनि सप्तस्थानी येत असून तो स्थानबली आहे. त्यामुळे आगामी अडीच वर्षात वैवाहिक बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या घटना घडतील. तुमच्या मूळ पत्रिकेत जर परदेश प्रवास अथवा श्रीमंती योग असतील तर या शनिच्या काळात या इच्छा पूर्ण होतील. भाग्योदयकारक घटना. वैवाहिक जोडीदार स्त्राr असो वा पुरुष आरोग्याच्या दृष्टीने जरा अनिष्ट.


सिंह

सहाव्या स्थानी येणारा मकरेचा शनि आगामी अडीच वर्षात तुम्हाला अनेक मार्गाने धनलाभ घडवील. हा शनि अत्यंत शुभ असल्याने त्याचे पावित्र्य अबाधित ठेवले तरच त्याची चांगली फळे मिळतील. अपघात, आजार, काही प्रकरणात लोकांचा प्रखर विरोध यांची शक्मयता. दैवीआराधना करीत असाल तर त्याचे चांगले फळ मिळेल.


कन्या

पंचमात येणारा मकरेचा शनि पीडादायक असे म्हणतात. पण हा शनि स्वगृहीचा असल्याने त्याची कोणतीही अनिष्ट फळे मिळणार नाहीत, पण वैवाहिक जीवन व मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्रास होऊ शकेल. या शनिची चांगली फळे मिळण्यासाठी व्यसनापासून दूर रहा.


तुळ

चतुर्थात मकरेचा शनि म्हणजे छोटी साडेसातीच. तिला ढैया किंवा अडीचकी म्हणतात. पण हा शनि स्वगृहीचा असल्याने मोठमोठय़ा योजना पूर्ण करू शकाल. जागा खरेदी, स्वत:ची वास्तू, कारखाना व वाहन होऊ शकेल. शुभ फलप्राप्तीसाठी या अडीच वर्षात वास्तूचा विशिष्ट तऱहेने योग्य मान ठेवा.


वृश्चिक

साडेसाती पूर्ण संपली असून आगामी अडीच वर्षे अतिशय चांली व भरभराटीची जातील. या शनिची राजयोग व श्रीमंती फळे मिळण्यासाठी सर्वतऱहेचे पावित्र्य ठेवा. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. मांसाहार व मद्यपान व सर्व तऱहेच्या व्यसनापासून दूर रहाल तर हा शनि आगामी दोन तीन वर्षात तुमच्या जीवनाचे सोने करील.


धनु

धनस्थानी मकरेच्या शनिचे आगमन साडेसातीचे अंतिम पर्व 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. नवे नोकरी व्यवसाय व उद्योग सुरू करू शकाल. श्रीमंती लाभेल. जमीनजुमला होईल. तुमच्या हातून कुणाचेही आर्थिक वा इतर बाबतीत अनिष्ट घडले नसेल तर हा शनि आगामी अडीच वर्षे तुम्हाला राजयोगाचे फळ देईल. पण व्यसन वा इतर अनिष्ट बाबी असतील तर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक त्रासात पडाल.


मकर

आपल्या आवडत्या राशीत शनि महाराज येत आहेत. राजयोग, श्रीमंती नोकरी, व्यवसायात उर्जितावस्था, भाग्योदय, आरोग्यात सुधारणा, नावलौकिक व स्वत:ची मालमत्ता होणे या दृष्टीने शनि अतिशय चांगला आहे. किमती वस्त्रप्रावरणे खरेदी कराल. आतापर्यंत जे झाले नाही, ते या शनिच्या कालखंडात करून दाखवाल. व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढेल. चंचलपणा, व्यसन व अनैतिक धनार्जन यांचा मात्र त्याग करावा लागेल.


कुंभ

शनि महाराज बाराव्या स्थानी येणार असून साडेसातीची सुरुवात होत आहे. जुने घर, अथवा मंदिर यांचा जीर्णोद्धार करण्याचा विचार कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय भाग्योदयकारक. सरकार कामात यश, घरमालक -भाडेकरू वाद मिटतील. सांसारिक जीवनातील सर्व तऱहेचे गैरसमज निवळतील. घरदार, वाहन तसेच इतर वस्तुसाठी बराच खर्च कराल. अपघात, आजार, स्फोटक पदार्थामुळे तसेच केमिकल वगैरेपासून धोका होईल.


मीन

लाभात आलेल्या मकरेच्या शनिमुळे काळय़ा रंगाच्या व्यवसायात उत्तम लाभ होतील. तीन-चार घरे व वाहन होण्याचे योग. शेअरबाजार वगैरेत मोठे लाभ होतील. मुलाबाळांचे सौख्य चांगले राहील. घराण्याचा उत्कर्ष होईल. कोणतेही व्यसन अथवा अवैध व्यवसाय नसतील तर हा शनि तुम्हाला गडगंज श्रीमंती देईल हे सारे अनुभव अडीच वर्षाच्या कालखंडात येतील.

Related posts: