|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 2 दिवसांत 32 वेळा झाले स्नो स्लायडिंग

2 दिवसांत 32 वेळा झाले स्नो स्लायडिंग 

एलओसीला लागून असलेल्या क्षेत्रात संकट

श्रीनगर 

 काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांमध्ये होत असलेली जोरदार हिमवृष्टी आता जवानांसाठी जीवघेणी ठरत आहे. हिमवृष्टीमुळे पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमस्खलनासह आता स्नो स्लायडिंगच्या घटना घडत आहेत. स्नो स्लायडिंगमुळे सीमावर्ती भागांमधील सैन्याच्या चौक्यांवर प्रभाव पडला आहे. 48 तासांमध्ये स्नो स्लायडिंगच्या 32 घटना घडल्या आहेत.

जोरदार हिमवृष्टीमुळे अनेकदा स्नो स्लायडिंगच्या घटना घडतात. अशा घटनांमध्ये बर्फाचे मोठे तुकडे शिखरांवरून खाली पडतात. हिमस्खलनात उंचीवरून बर्फ हळूहळू खाली येतो. तर स्नो स्लायडिंगदरम्यान बर्फाचे तुकडे घरगंळत खाली कोसळतात. अशा घटना अचानक घडत असल्याने जीवितहानी घडते.

सियाचीनच्या नॉर्थ ग्लेशियरमध्ये पारा उणे 57 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उत्तर काश्मीरच्या अनेक भागांमध्येही पारा शून्याच्या खाली गेला आहे. तापमान अत्यंत खालावूनही सैनिक सीमेवर पहारा देत आहेत. पण स्नो स्लायडिंगच्या घटना पाहता संवेदनशील भागांमधून काही जवानांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

नौगाममध्ये बीएसएफची चौकी स्नो स्लायडिंगच्या तावडीत सापडली आहे. तेथे अडकून पडलेल्या 4 जणांना वाचविण्यास यश  आले आहे. तर यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. बारामुल्लाच्या उरीमध्येही स्नो स्लायडिंगचा फटका सैन्याच्या चौकीला बसला आहे. तेथे तैनात 7 सैनिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर तंगधारमध्ये मंगळवारी घडलेल्या स्नो स्लायडिंगनंतर 6 जवानांना वाचविण्यास यश आले आहे.

Related posts: