|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » प्रदुषणामुळे शरापोव्हाचा सामना वाया

प्रदुषणामुळे शरापोव्हाचा सामना वाया 

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

मंगळवारी येथे कुयाँग क्लासिक महिलांच्या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत प्रदुषणामुळे रशियाच्या मारिया शरापोव्हाचा सामना वाया गेला.

या स्पर्धेत शरापोव्हा आणि जर्मनीची सिगमंड यांच्यातील हा सामना सुरू झाला असताना अचानकपणे प्रदुषणामुळे टेनिसपटूंना खेळताना अस्वस्थता जाणवू लागली. पंचांनी याची दखल घेत लागलीच हा सामना अर्धवट स्थितीत थांबविला. या सामन्यात सिगमंडने 7-6 (7-4) असा पहिला सेट जिंकून दुसरा सेट 5-5 असा बरोबरीत राखला होता. पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी 32 वर्षीय शरापोव्हाला स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिला आहे.

Related posts: