|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » लक्ष्य सेन, शुभंकर डे पात्रता फेरीतच पराभूत

लक्ष्य सेन, शुभंकर डे पात्रता फेरीतच पराभूत 

वृत्तसंस्था/ जकार्ता

भारताचे युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन व शुभंकर डे पात्रता फेरीतच पराभूत झाल्याने त्यांना इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले.

18 वर्षीय लक्ष्य सेनला थायलंडच्या एस. टॅनाँगसॅककडून 13-21, 12-21 असा केवळ 32 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. सेनने 2018 मध्ये झालेल्या विश्व कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळविले होते. शुभंकर गेल्या महिन्यात इटालियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरला होता. पण येथे त्याला थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसॅननकडून 16-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचे अव्वल बॅडमिंटनटपटू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल महिला एकेरीत तर किदाम्बी श्रीकांत, बी. साई प्रणीत, एचएस प्रणॉय, पी. कश्यप, समीर वर्मा पुरुष एकेरीत खेळणार आहेत.

 

Related posts: