|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व

राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

स्टार स्ट्रायकर राणी रामपालकडे न्यूझीलंड दौऱयासाठी 20 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवले गेले. भारताचा हा दौरा दि. 25 जानेवारी रोजी ऑकलंड येथे हाणाऱया पहिल्या लढतीने सुरु होईल. गोलरक्षक सविता ही उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.

रजिनी इतिमर्पू, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रीना खोखर, सलीमा टेटे, सुशीला चानू, निशा, नमिता टोप्पो, उदिता, मोनिका, लिलिमा मिन्झ, नेहा, सोनिका, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारिया व नवज्योत कौर यांचाही संघात समावेश आहे. भारताची पहिली लढत न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्ध दि. 25 जानेवारी रोजी होणार असून त्यानंतर न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध दि. 27 व 29 जानेवारी रोजी त्यांचे सामने होतील.

भारतीय महिला हॉकी संघ त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी ग्रेट ब्रिटनविरुद्ध लढेल तर दि. 5 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध त्यांचा आणखी एक सामना खेळवला जाणार आहे.

‘आम्हाला या दौऱयाच्या माध्यमातून संघातील खेळाडूंमध्येच स्पर्धा, रस्सीखेच निर्माण करायची आहे. या दौऱयासाठी 20 खेळाडूंचा संघ नेत असलो तरी काही सामन्यात आम्ही फक्त 16 खेळाडूनिशी खेळू. कारण, ऑलिम्पिकमध्ये 16 खेळाडूंचा चमू असतो व काही सामन्यात आम्ही 18 खेळाडूंसह खेळणार आहोत’, असे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक सोरेद मारिने यांनी याप्रसंगी नमूद केले.

भारतीय महिला हॉकी संघ : राणी (कर्णधार), सविता (उपकर्णधार), रजिनी इतिमर्पू, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रीना खोखर, सलीमा टेटे, सुशीला चानू, निशा, नमिता टोप्पो, उदिता, मोनिका, लिलिमा मिन्झ, नेहा, सोनिका, शर्मिला देवी, नवनीत कौर, लारेम्सियामी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.

Related posts: