|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नवजात मुलीचा गळा दाबून खून

नवजात मुलीचा गळा दाबून खून 

वरवडेत अनैतिक संबधातून मातेचे कृत्य

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथील खाडीच्या खाजणात 22 डिसेंबर 2019 ला स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले होते. सुमारे महिन्याभरानंतर या नवजात मुलीच्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आह़े अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या मुलीचा आईनेच गळा दाबून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी संबधीत मातेला अटकही करण्यात आली आहे.

   जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही जयगड परिसरात मच्छिमारीचा व्यवसाय करत़े या विवाहित महिलेचे  गावातील तरूणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होत़े या अनैतिक संबंधातून तिने या मुलीला जन्म दिला होत़ा, अशी माहिती समोर आली आहे.  मंगळवारी या महिलेला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

   22 डिसेंबर 2019 रोजी खालचे वरवडे येथील पोलीस पाटील नंदकुमार सिताराम खेडेकर (56) यांनी वरवडे भंडारवाडीत खाडीच्या खाजणीत मृत स्त्री जातीचे अर्भक असल्याची खबर जयगड पोलिसांत दिली होत़ी सुमारे 24 तासापूर्वी जन्मलेल्या या स्त्री अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी जयगड पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा पोलिसांच्या तपासामध्ये हे अर्भक वरवडे येथील 40 वर्षीय महिलेचे असल्याचे तपासामध्ये समोर आले हेत़े ही महिला विवाहित असून अनेक वर्षापासून ती नवऱयापासून वेगळी राहत़े तिचे गावातील तरूणासोबत प्रेमसंबध असून त्यातूनच ती गर्भवती राहिली होत़ी मात्र अनैतिक संबंध सर्वांसमोर उघड होतील या भितीने तिने जन्माला आलेल्या या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आह़े

वरवडे भंडारवाडीच्या खाडीच्या खाजणीत मृतावस्थेत मिळालेल्या अर्भकाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रूग्णालयात करण्यात आले होत़े प्रथमदर्शनी अर्भकाचा गळा दाबल्याने मृत्य झाल्याचे निष्पन्न झाले होत़े मात्र व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आह़े या घटनेमध्ये व्हिसेरा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरणार असून त्यानंतरच अर्भकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आह़े जयगड पोलिसांनी या महिलेविरूद्ध  मृत्यू घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीसाठी भादवि कलम 315 व अर्भकाची विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली भादवि कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला आह़े

Related posts: