|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खेलो इंडिया स्पर्धेत सुदेष्णाची सुवर्णभरारी

खेलो इंडिया स्पर्धेत सुदेष्णाची सुवर्णभरारी 

ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने घेतला बळी

प्रतिनिधी/ सातारा

सातारची सुपरफास्ट धावपट्टू सुदेष्णा शिवणकर हिने आसाम राज्यात गुवाहटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावत 4 बाय 100 या रिले धावणे क्रीडा प्रकारात सुवर्णभरारी मारली आहे. गतवर्षी पुणे येथे झालेल्या खेलो इंडियात दोन सुवर्णपदकांवर मोहर उमटवणाऱया सुदेष्णाने यावर्षी देखील सुवर्णपदक पटकावल्याने तिच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, दुपारी झालेल्या 200 मीटर धावणे क्रीडा प्रकारात तिने कांस्य पदक पटकावत तीन या स्पर्धेत दोन सुवर्ण व कांस्य पदकाची मानकरी ठरली.

आसाम गुवाहटी येथे तिसरी खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सोमवारी रात्री 17 वर्षाखालील मुलींच्या गटात 4 बाय 100 रिले प्रकारात यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची विद्यार्थिनी असलेल्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने सलग दुसऱयांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी झालेल्या 200 मीटर धावणे प्रकारात तिने कांस्य पदक पटकावत ती दोन पदकांची मानकरी ठरली आहे. या राष्ट्रीय स्पर्धात सुदेष्णा शिवणकर हिने सलग दुसऱयांदा मेडल्स मिळवण्यात सातत्य राखत महाराष्ट्राच्या पदक गुणतालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुदेष्णाने सुवर्ण व कांस्य पदक मिळवल्यानंतर साताऱयात जल्लोष करण्यात आला. सुदेष्णा शिवणकरसह प्रांजली पाटील, श्रेया शेडगे आणि सृष्टी शेट्टी यांनी या स्पर्धेत यश संपादन केले. 

तिच्या या कामगिरीने सातारची मान उंचावली असून यापूर्वीही तिने खेलो इंडियासह जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केलेली आहे. सुदेष्णाचे वडील हणमंत शिवणकर हे सातारा पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. वडील पोलीस असल्याने पोलीस दलातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. तिला तालुका क्रिडा अधिकारी बळवंत बाबर व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे क्रीडा शिक्षक गुजर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

मागील वर्षी पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धामध्येही सुदेष्णाने दोन सुवर्णपदक मिळविली होती. यावर्षी देखील तिने चमकदार कामगिरी करत दोन्ही क्रीडा प्रकारात ही सुपरफास्ट धावली व तिने सुवर्ण व कांस्य पदकांवर मोहर उमटवली आहे. खेलो इंडया स्पर्धेत सलग दोन पदके मिळविण्यात सुदेष्णाने सातत्य राखले असून तिच्या या यशाने सातारा जिल्हय़ाची मान उंचावली आहे.

Related posts: