|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धारवाडजवळ भीषण अपघातात चार ठार

धारवाडजवळ भीषण अपघातात चार ठार 

कारची टेम्पोला धडक : सर्व मृत कोप्पळचे : दोघे गंभीर जखमी

वार्ताहर/ हुबळी

कार-टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन वर्षाच्या बालकासह चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना धारवाड तालुक्यातील यरीकोप्प येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मंगळवारी घडली. सर्व मृत कोप्पळ येथील आहेत.

रुद्रप्पा मरीकुरी (वय 65), ईरम्मा मरीकुग्नरी (वय 62), मंजुनाथ मरीकुरी (वय 40), आणि शिवानंद अलवाडी (वय 2) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. घटनेबाबत माहिती अशी, ईरम्मा यांच्यावर उपचार करण्यासाठी मुळच्या कोप्पळ जिल्हय़ाच्या गंगावती येथील रुद्रप्पा यांच्यासह सहा जण कारमधून बेळगावकडे जात होते. दरम्यान, बेळगावकडून हुबळीकडे येणाऱया टेम्पोला कारची जोराची धडक बसली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवानंद याला उपचारसाठी इस्पितळात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या ममता आणि सान्वी यांना उपचारासाठी धारवाड जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख वर्तिका कटीयार यांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.

 

Related posts: