|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » सिंचन घोटाळय़ाप्रकरणी अजित पवारांनी दाखल केले शपथपत्र

सिंचन घोटाळय़ाप्रकरणी अजित पवारांनी दाखल केले शपथपत्र 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

सिंचन घोटाळय़ाप्रकरणी अजित पवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथ पत्र दाखल केलं आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. 

सिंचन घोटाळय़ाप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी अतुल जगताप यांनी केली आहे. दरम्यान, सिंचन घोटाळय़ात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिन चीट दिली. त्यानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या जनहित याचिका फेटाळण्यात याव्यात यासाठी अजित पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये विनंती अर्ज दाखल केला आहे.

 

Related posts: