|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » राज्यात लवकरच पोलीस भरती : अनिल देशमुख

राज्यात लवकरच पोलीस भरती : अनिल देशमुख 

ऑनलाइन टीम / नागपूर : 

महाविकास आघाडीच्या गृहविभागाने सध्या मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, जवळपास सात ते आठ हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. दिवंगत जे डी पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री बोलत होते.

तसेच या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे. कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलणार आहे. नक्षलवाद तसेच अवैध सावकारी याला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

Related posts: