|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » वारणा दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम 

वारणा दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम  

वारणानगर / प्रतिनिधी :

तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सह दूध उत्पादक प्रक्रिया संघामार्फत मादी वासरु पैदास होणारे वीर्यमात्राचे वितरण व्हा .चेअरमन डॉ. भाऊसाहेब गुळवणी व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात आले

दूध संघाच्या मादी वासरु पैदास उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या गोठयामधील म्हैस, गायीस ९० ते ९५ टक्के मादी वासरेच पैदास होणार असून यासाठी वापरण्यात येणाऱ्या विर्यमात्रा अतिउच्च दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या वळूपासून तयार करण्यात आल्या आहेत, त्यामुळे होणाऱ्या कालवडी व रेड्या यांचे दूध उत्पादनात भरघोस वाढ होईल तसेच सर्व साधारण वीर्यमात्रेमुळे पैदास होणाऱ्या नर वासरावरील खर्च कमी होण्यास मदत होईल पर्यायाने दूध उत्पादकांचा फायदा होईल. सदर विर्यमात्राची किमंत सर्वसाधारण १५०० ते २००० रू. प्रति मात्रा असून , वारणा संघामार्फत संघाच्या दूध उत्पादकासाठी रु. ३०० ला देणेत येणार आहे असे व्हा. चेअरमन डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी सांगितलेयाचा निश्चितच दूध उत्पादकांना चांगला फायदा होईल असे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यानी संगीतले.

सदर कार्यक्रमासाठी संघाचे सचिव काशिनाथ वाले, पशुवैद्यकिय विभागाचे डॉ. एन. एस. वडजे, डॉ. . पी. कोटगिरे, डॉ. जे. बी. पाटील, वारणा दूध संघाचे सर्व कृत्रिम रेतक व तात्यासाहेब कोरे ऊर्जाअंकुर संस्थेचे श्री. खोत, श्री पाटील हे उपस्थित होते.

Related posts: